The city of Minneapolis in the United States has decided to dismiss the police force 
Blog | ब्लॉग

म्हणून अमेरिकेतील 'या' नगरपरिषदेने पोलिस दल बरखास्तीचा केला संकल्प...

सचिन चराटी

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड हा कृष्णवर्णीय व्यक्ती पोलिसांच्या अत्याचाराला बळी पडल्याचे पुढे आल्यानंतर अमेरिकेसह युरोपमध्ये जोरदार आंदोलने सुरू आहेत. फ्लॉइडच्या मृत्यूने वंशद्वेषाचा प्रश्‍न जसा पटलावर आला तसेच पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवरही चर्चा होऊ लागली आहे. या घटनेनंतर जेथे ही घटना घडली त्या अमेरिकेतील मिनियापोलिस या नगरपरिषदेने पोलिस दल बरखास्तीचा संकल्प केला आहे. फ्लॉइडच्या मृत्यूप्रकरणी पोलिस दलाची नागरी हक्कांच्या अनुषंगाने चौकशी केली जाणार आहे. ज्या कृत्यामुळे फ्लॉइडचा मृत्यू झाला, असा आरोप दलावर होत आहे, त्या पाठीमागून गळ्याची पकड करणे, मानेवर दाब देणे अशी कृत्ये करण्यावर बंदी घालण्याचे नगरपरिषदेने ठरविले आहे. पोलिस दलाची संपूर्ण फेररचना येत्या काही महिन्यांत करण्याचा निर्धार येथील नगराध्यक्षा लिसा बेंडर यांनी केला आहे. पोलिस दलाचा संपूर्ण निधी रोखणे किंवा ते बरखास्त करणे, असे खात्रीलायकपणे घडेलच असे नाही; पण एकूण पोलिस दलाच्या फेरमांडणीची चर्चा तेथे सुरू झाली आहे.

तुलनेत इंग्लंड आणि अमेरिकेत पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन विश्‍वासू आणि आदराचा आहे. 1823 मध्ये इंग्लंडमध्ये रॉबर्ट पील याने पोलिस दलाची उभारणी केली. त्यावेळी नागरिकांनी या पोलिसांना पील याच्या गुंडांची टोळी, असे संबोधले होते. आता मात्र इंग्लंडमधील नागरिकांमध्ये पोलिस हा सर्वांत लोकप्रिय अधिकारी मानला जातो. पील याच्या गुंडांची टोळीपासून ते लोकप्रिय अधिकारी हा इंग्लंडमधील पोलिस यंत्रणेचा प्रवास कोणत्याही व्यवस्थेसाठी प्रेरणादायी असाच आहे. अमेरिकेतील पोलिस यंत्रणासुद्धा कार्यकुशल म्हणून ओळखली जाते.

कोणत्याही देशातील अंतर्गत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आखली गेलेली ही पोलिस दलाची व्यवस्था सामाजिक शांततेसाठी महत्त्वाची मानली जाते; पण अशा व्यवस्थांकडून मानवी मूल्यांचे वारंवार उल्लंघन होताना दिसते. यातून अशा व्यवस्था देशाच्या, राज्याच्या दमनशाही यंत्रणा झाल्याचे पाहावयास मिळतात. मग मिनियापोलिससारख्या घटना न घडतील तरच नवल. या घटनेनंतर मिनियापोलिसमधील नागरिकांनी जोरदार निदर्शने करत पोलिस दलाच्या कार्यपद्धतीचा निषेध केला आणि दलाच्या सुधारणेसाठी आग्रह धरला. मिनियापोलिस नगरपरिषदेने ते गांभीर्याने घेतले.

या सगळ्या घडामोडींकडे पाहिल्यावर आपल्याकडील पोलिस यंत्रणेचे आपल्याला आलेले अनुभव आठवल्याशिवाय राहणार नाहीत. लहान असताना पोलिसमामा म्हणून आपल्या मनात रुजलेली ही ओळख आपलं वय वाढेल तशी पुसट होत जात सावज शोधणारा 'पक्षी' अशी का होते, सामान्य माणूस पोलिसांचा विषय काढला की, का बिचकतो हा चिंतनाचा विषय आहे. हे सर्व प्रश्‍न संवादातून सुटणारे आहेत की, यासाठी धोरणात्मक बदल करायला हवेत याचा अभ्यास करण्याची आवश्‍यकता आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT