Communication is essential and necessary in human life 
Blog | ब्लॉग

‘काय पावणं, कुठं चाललाय...?

सर्जेराव नावले

    बोलण्याने जग जिंकता येते आणि बोलण्याने मनही जिंकता येते. मने जुळतात, युद्धेही होतात. विसंवादाने माणसा-माणसात मतभेद वाढतात तर सुसंवादाने मतभेदाची दरी सांधता येते. शब्द दुधारी शस्त्र मानले जाते. शब्दाने वाढतात वाद आणि शब्दानेच होतो सुसंवाद. संवाद मानवी जीवनात अत्यावश्‍यक आणि गरजेचा असतोच.

कामानिमित्त एका गावी जाणं झालं. तासाभराचा एसटीचा प्रवास. सकाळी साधारण दहाची वेळ. सीबीएसवर एसटीत बसलो. इतकी गर्दी होती, की तासाच्या प्रवासात बसायला सीट मिळण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू होती. बसमध्ये नोकरदार, विद्यार्थी बरेच होते. बहुधा ते या एसटीला नेहमीचे प्रवासी असावेत. पाच मिनिटांत कंडेक्‍टर आला. ‘पुढे चला, पुढे चला’, असं सर्वांना सांगत होता. त्यानंतर दहा मिनिटेच काय तो गोंगाट सुरू होता. काही वेळातच एक-दोघे वगळता प्रत्येकाने आपापले मोबाईल काढले. कोणी चॅटिंग करत होते तर कोणी एअर कॉडद्वारे गाणी ऐकत होते. यातले बरेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होते. कंडेक्‍टर प्रत्येक सीटजवळ जाऊन तिकीट देत होता. काही जण त्याच्याकडे न बघताच आपले पास पुढे करत होते. बस शहरातून बाहेर पडली. काही महिला, प्रौढ नागरिकांचे बोलणे सोडले तर प्रत्येकाचं डोकं मोबाईलमध्ये होते. शेजारचं कोण गाडीतून उतरलंय, कोण जवळ येऊन बसलंय, याचं किंचितही देणं-घेणं मोबाईलमध्ये गुरफटलेल्यांना नव्हतं. प्रत्येक स्टॉपला गाडी थांबत होती. प्रवासी उतरत होते, नवीन प्रवासी चढत होते.

हे चित्र मला माझ्या स्टॉपपर्यंत जाणवले. दुपारी याच स्टॉपवरून परतण्यासाठी एसटीत बसलो. गाडीत पुन्हा सकाळचे तेच चित्र पाहायला मिळाले. प्रत्येकाला मोबाईलनं कवेत घेतलं होतं. इतकं की, एका विद्यार्थ्याला त्याचा स्टॉप येऊन गेला ते कळलंच नाही. पुढच्या स्टॉपवर गाडी थांबल्यावर तो विद्यार्थी कंडेक्‍टरशी हुज्जत घालू लागला. ‘मला सांगायचं नाही का ? बेल द्यायची नाही का?’ असे म्हणत तो वाद घालू लागला. कंडेक्‍टरनं प्रत्येक स्टॉपला बेल दिली होती; पण मोबाईलमध्ये गुंतल्याने स्टॉप कधी येऊन गेला हे त्याला कळलंच नसावं. तो विद्यार्थी कंडेक्‍टरला असंबद्ध बडबडू लागला. कंडेक्‍टर मग मात्र त्याच्यावर ओरडला, ‘आधी फोनमधनं डोकी बाहेर काढा, आणि मग मला इचारा. तुमचं रोजचं हाय ह्ये.’ तो विद्यार्थीही बडबडतच खाली उतरला. हा अनुभव मात्र अस्वस्थ करून गेला. पूर्वी एसटी प्रवासात शेजारचा प्रवासी ‘काय पावणं, कुठं चाललाय? कुठल्या गावचं तुमी,’ असं करत करत संवाद साधायचे. शहरातल्या डॉक्‍टरकडे रांगेत जरी बसलं तरी एखादा ‘काय व्हुतंय, कुणाला बरं नाही,’ अशी आपुलकीने विचारपूस व्हायची. यातून ओळखीपाळखी व्हायच्या. दोन मनं एकत्र यायची. संवादाचा पूल बांधला जायचा. पण आज संवादाचा अभाव आणि हरवलेल्या संवादाची दाहकता गावागावात आणि घराघरात पोहचल्याचे दिसते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT