copy cut paste function in information technology 
Blog | ब्लॉग

‘कॉपी, कट, पेस्ट’ने जग बदललं...!

प्रफुल्ल सुतार

   ‘कॉपी, कट, पेस्ट’ हे तीन शब्द माहीत नाहीत, असा अपवादानेच सापडेल. कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि अगदी स्मार्टफोन वापरणारा हमखास या पद्धतींचा अगदी सहजपणे वापर करतोय. टायपिंग असो की सोशल मीडियावर मजकूर पोस्ट करणे, ‘कॉपी, कट, पेस्ट’मुळे काम अगदी सहज सोपं होऊन जातं.
कॉम्प्युटरच्या की-बोर्डपासून सुरू झालेला ‘कॉपी, कट, पेस्ट’चा प्रवास आज स्मार्टफोनच्या जमान्यातही आपले महत्त्व अबाधित राखून आहे. कॉम्प्युटरवरचं काम Ctrl C, Ctrl X आणि Ctrl V या शॉर्टकट कींमुळे तर अतिशय सोपं केलं. या तिन्ही पद्धतींचा शोध लावणारे संगणक शास्त्रज्ञ लॅरी टेस्लर यांचं नुकतंच ७४ व्या वर्षी निधन झालं. मात्र, त्यांनी जगाला दिलेली ही अद्वितीय देणगी भविष्यातही कायम राहील. 

एखादी माहिती पुनः-पुन्हा टाईप करण्याऐवजी किंवा एखादा मजकूर दुसऱ्या ठिकाणी क्षणार्धात हलविण्यासाठी वापरली जाणारी ही पद्धती होय. कॉम्प्युटर, लॅपटॉपचा तर ती एक अविभाज्य भागच बनली आहे. आजही त्याचा पदोपदी वापर केला जातोय.

‘कॉपी, कट, पेस्ट’मध्ये टाईप करताना एखादा मजकूर दुसऱ्या ठिकाणी हलवायचा झाल्यास तो प्रथम मजकूर सिलेक्‍ट करून ‘कट’ हा पर्याय निवडावा लागतो. या प्रक्रियेत मजकूर त्या जागेवरून तात्पुरता नाहिसा होईल. आणि ज्या ठिकाणी तो ठेवायचा असतो त्या ठिकाणी ‘पेस्ट’ केला की त्याठिकाणी हलविला जातो. एखादा मजकूर जेव्हा दुसऱ्या ठिकाणीही तसाच हवा असतो, त्या वेळी ‘कॉपी’चा पर्याय निवडावा लागतो. यात सिलेक्‍ट केलेला मूळ मजकूर हा, आहे त्या ठिकाणीच राहतो, आणि ‘पेस्ट’ म्हटतो त्या ठिकाणी त्याची नक्कल जाते. मजकुराबरोबरच फोटो आणि व्हिडिओ एडिटिंगवेळीही या पद्धतीचा 
वापर होतो.

लॅरी टेस्लर यांचा जन्म १९४५ मध्ये न्यू यॉर्क येथील ब्रॉन्क्‍समध्ये झाला; तर त्यांचं कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण कॅर्लिफोर्नियातील स्टॅण्डफोर्ड युनिव्हर्सिटीमधून पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी काही कालावधीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ‘एआय’वर संशोधन केलं. कॉम्प्युटरमधील तज्ज्ञ ॲलन के यांनी लॅरी यांना १९७३ मध्ये झेरॉक्‍स कंपनीच्या ‘पॅलो ऑल्टो रिसर्च सेंटर’ (पीएआरसी) येथे नोकरीची संधी दिली. येथे त्यांनी टिम मॉथ यांच्याबरोबरीने ‘जिप्सी टेक्‍स्ट एडिटर’ची निर्मिती केली. यात त्यांना मजकूर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविणे, तोच मजकूर पुढे हवा असल्यास पुन्हा टाईप करण्याची समस्या जाणवली. यासाठी त्यांनी मोडलेस पद्धती तयार केली. आणि इथेचं ‘कॉपी, कट, पेस्ट’ या भन्नाट कल्पनेनं जन्म घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT