Experiment in Lockdown: 'Tarahi' Gazal mushayara 
Blog | ब्लॉग

लॉकडाउनमधला प्रयोग : तरही मुशायरा

युवराज यादव

लॉकडाउनमुळं सारं जग थांबलं. स्थितप्रज्ञाचं जीवन सुरू झालं. केवळ मूलभूत गरजांसाठीच बाहेर येणं होऊ लागलं. या गर्तेत कलाकारही अडकले; पण त्यांचं कलात्मक मन थांबलं नाही. अशा अवस्थेतही ते वेगळे प्रयोग करू लागले. यात गझलकार कसे मागे राहतील? वेगवेगळ्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवरून ऑनलाईन मुशायऱ्यासारखे उपक्रमही ते राबवू लागले. गझलनवाझ भीमराव पांचाळे यांनी तर त्याही पुढे जात एक वेगळा संकल्प सोडला... तरही मुशायऱ्याचा! 

एका कार्यक्रमानिमित्त भीमराव पांचाळे अमरावती परिसरात गेले होते आणि लॉकडाउन सुरू झाले. त्यामुळे त्यांना मुंबईला न येता मूळ गावी आष्टगावला जावे लागले. गावच्या शांत आणि निसर्गरम्य परिसरात त्यांना यामुळे रमता आले. इथे त्यांनी घरच्यांसाठी गझल, उर्दूचे वर्ग घेतले. याच काळात गझलकार सुरेश भट यांचा जन्मदिवस (15 एप्रिल) आला. तो कसा साजरा करावा, याचा विचार करीत असतानाच त्यांना "तरही मुशायऱ्या'ची संकल्पना सुचली. आष्टगावात उभारलेल्या सुरेश भट ग्रंथालयात त्यांना अभिवादन केले व आपल्या गझलकारांना "तरही'साठी भटसाहेबांचाच मिसरा दिला... 

नाही म्हणावयाला आता असे करूया... 
मुशायऱ्याचा हा एक खूप जुना प्रकार आहे. "तरही' म्हणजे इस तरह लिखो. म्हणजे, एखाद्या प्रसिद्ध शायराचा मिसरा दिला जातो. त्याचे वजन, काफिया (यमक), रदीफ (अंत्य यमक), अलामत (स्वरचिन्ह) इत्यादी समजून घेऊन इतर शायरांनी आपले शेर रचून आपापली गझल बांधायची असते. एक आव्हान असते. लिहिणाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत काफिये मात्र मर्यादित असतात. त्यामुळे खयाल टकराना (विचार एकसारखा येणे), मिसरा टकराना (ओळी एकसारख्या येणे) आणि कधी कधी तर शेरसुद्धा एकसारखे येऊ शकतात; मात्र अजाणतेपणी. या सगळ्या प्रकारात मोठी गंमत तर येतेच, रियाज पण खूप होतो. रुई धुनकल्याप्रमाणे विषय धुनकून निघतो. आपल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 170 हून अधिक तरही गझला आल्या, अजूनही येत आहेत. महाराष्ट्रासह देशभरातून आणि दुबई, मस्कत, साउथ आफ्रिका, अमेरिका आदी ठिकाणांहूनही शायरांनी गझला पाठविल्या असल्याचे त्यांनी सांगिले. यानिमित्त "तरही'वर एक छान आणि उपयुक्त असे पुस्तक "गझल सागर प्रतिष्ठान'तर्फे प्रकाशित करण्याचा मनोदयही त्यांनी बोलून दाखविला आहे. खरोखरच लॉकडाउनच्या काळात गझलकारांच्या संकल्पनाशक्‍तीची मशागत करण्यासाठी हा एक उत्तम प्रयोग ठरणार आहे. 

मुझे यकीन है! 

तरही'चा हा मनभावन प्रकार गझलकार व रसिकांना परिचित होईल. निरंतर शिकत राहणे, रियाज करणे, मनन-चिंतन करणे, इतरांचंही लेखन वाचणे, दिलखुलास दाद देणे ही प्रक्रियाच आहे सृजनाची आणि खूण आहे चांगला कलावंत असण्याची. तरहीचे चलन मराठी गझलच्या विकासाला नक्कीच चालना देईल- मुझे यकीन है! 
- गझलनवाझ भीमराव पांचाळे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : मराठी संघटना आज पोलिस उपायुक्तांची भेट घेणार

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT