Blog | ब्लॉग

गोफण| फडतूस नहीं काडतूस!

संतोष कानडे

(बाण हिरावले असले तरी शब्दबाणांनी समोरच्याला जखमी करायची कला तिकडच्या स्वारींकडे आहेच. त्यामुळे मात्र इकडच्या स्वारींना यातना भोगाव्या लागत आहेत...)

इकडूनः (गंभीर आवाजात) हॅलोss.

तिकडूनः हॅलोss.कोण?

इकडूनः काडतूस!

तिकडूनः (जाणीवपूर्वक) फडतूस का?

इकडूनः (आवेशात) नाSSय.. काड-तूस

तिकडूनः (मिश्किलपणे हसत) काडतूस? कोण काडतूस?

इकडूनः (रागात) मीच-मीच खराखुरा..अस्सल काडतूस!

तिकडूनः म्हणजे फडतूसच ना?

इकडूनः सांगितलं ना एकदा.. काडतूस म्हणायचं आपल्याला!

तिकडूनः (बेदरकारपणे) नाही जमणार! पुढं?

इकडूनः (संयम निसटला) ...घुसेगा साला

तिकडूनः (आरामात) अच्छा! ...कहेना क्या चाहतें हों?

इकडूनः (चिरडीला येत) फडतूस नहीं.. काडतूस हूं मैं.. याद रखना

तिकडूनः (पेटवायच्या मूडमध्ये) खरंच की काय?

इकडूनः (रडकुंडीला येत) घुसेगा साला.. हं. (मध्येच डोळे पुसत) याद रख

तिकडूनः (शंकरपाळ्या स्टाईल चेकाळत) काडतुश्याSS

इकडूनः (कॅरॅक्टरमध्ये घुसून) आभण ऱ्हाय बाबू..

तिकडूनः जा.. न्हाय ऱ्हात

इकडूनः (निर्वाणीचं) मही खिज का पाडली त्वा?

तिकडूनः (आतून भीती वरुण बाणा) काय करशील?

इकडूनः माही खिज ज काडली ना... एकच प्रकरण काडीन, दुसरं काडनार बी न्हाई

तिकडूनः (उसणं आवसन आणून) काडतुश्याSSS

इकडूनः (जशास-तसं) घरबश्याSS

तिकडूनः लाळघोटेपणा बंद करा आता...

इकडूनः (रडू आवरत) ...नागपूरचाय मी ध्यानात ठ्वा

तिकडूनः (बाणा उफाळून आला) नाय ठिवनार ध्यानात.. इसरनार-इसरलो.. आता बोल?

इकडूनः (मजनू स्टाईल) बात निकलेगी तो दूर तर जाएगी बाबू

तिकडूनः (कोटी करत) बाता नका मारू इथं बाप चोरलाय... त्याचं काय ते बोला

इकडूनः (दुःखात आनंद शोधत) असं पाह्यजेल... हाहा.हाहाहा..!

(कसं हरवलं.. या भावनेतून इकडच्यांनी खाडकन् फोन ठेवला. तिकडच्यांना मात्र आशा लागली होती. आणखी बोलायचं होतं. पण-)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT