Blog | ब्लॉग

सह्याद्रीचा छावा : छत्रपती शिवाजी महाराज

धनश्री शेलार

पल्या महाराष्ट्राचा इतिहास घडला शहिदांच्या दफनानी, घोड्याच्या टापांनी, तलवारीच्या खानखानाटणी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीन अन सह्याद्रीच्या ढालीन. अन हा इतिहास घडण्यासाठीच तो दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 हा सोनेरी क्षणांनी सजला कारण सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला , इतिहास घडवणारा भूमीवर अवतरला अश्या ह्या छाव्याला आपण आई जिजाऊंचे पुत्र, गोरगरीब रयतेचे छत्र, महान योद्धे, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज या नावाने आदरितो, जाणितो, पूजितो. याच राजाची आपण आज मोठ्या उत्साहात आनंदाने शिवजयंती साजरा करितो. 

सोशल मीडियावर शिवजयंतीच्या संदेशाचा तर पेवच फुटते आणि फक्त आजच्या दिवसा पुरती शिवविचारांची व धोरणाची लाट येते, पण विचार करा महाराजांना काय हेच अभिप्रेत होते? अरे महाराजांची जन्म कथा आठवली तरी प्रेरणा मिळते मग आजच्या पिढिला त्याचे ध्यान का नाही का आजच्या दिवसा पुरती शिवधोरणाची लाट दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा सारा सनाट? असं घडू नये म्हणून जाणून घेऊ महाराजांच्या जन्माचा थाट.

सर्वत्र हाहाकार पसरला होता विनाशकारी परिस्थिती पसरली होती यवन माजले होते, देवाला खुशाल पायाखाली तुडवत होते लोकांना गुलामासारखे वागवत होते आणि लोक नाईलाजाने लपून बसले होते.
" परित्रणाय साधूंना विनाशयाच दुष्कृतांम। 
धर्मसंस्थापणार्थय संभवामी युगे युगे।"
जेव्हा जेव्हा पृथ्वीवर जुलूम वाढेल तेव्हा तेव्हा परमेश्वर जुलूम नष्ट करण्यासाठी अवतार घेईल आणि 19 फेब्रुवारी 1630 हा त्या अवताराच्या आगमनासाठीच उगवला सोनेरी किरणांनी सजला शिवनेरीवर एक शूरवीर जन्मला. गडाची देवता शिवाई देवी म्हणून त्या शूरवीराचे नाव शिवबा ठेवले. सर्वत्रि आनंद पसरला. छत्रपती शहाजी महाराज विजापूरच्या सेवेत व्यस्त असल्याने बाळ शिवाजीची जबाबदारी माता जिजाऊंवरच पडली. त्यामुळे रामायण, महाभारत, शस्त्रकला व राजकारणाच्या संस्कारात छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण घडले. जेव्हा शिवबा दहा वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या मनात आले की गाई वासरांच्या व लेकी सुनांच्या सुखासाठी रामराज्य निर्माण व्हावे आणि त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले. 

अवघ्या वयाच्या पंधराव्या वर्षीच महाराजांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि 17 वर्षाचे होताच महाराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. एवढेच नाही तर त्याच साली शिवरायांनी कोंढाणा आणि पुरंदर जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. याशिवाय तोरणगड समोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याचे नाव राजगड असे ठेवले. महाराजांनी त्यांची स्वतःची राजमुद्रा तयार केली. 
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णूविरशह ववंदीता शाहसुनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"
याचा अर्थ असा की " प्रतिपदेचा चंद्र जसा वाढतं जातो, आणि सारे विश्व त्यांना  जसे वंदन करते, तशीच ही मुद्रा  व तिचा लौकिक वाढत जाईल ."

त्यानंतर इ.स 1659 पर्यंत महाराजांनी जवळपास पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते. याच प्रकारे महाराजांनी पुढे अनेक जमिनीवर स्वामित्व स्थापन केले शंभरहून अधिक किल्ले जिंकले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राजाभिषेक झाला. आपल्या स्वराज्याची स्थापना झाली.


वरील लेखातील विचार हे संबंधित लेखकाचे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT