The lesson of Corona 
Blog | ब्लॉग

कोरोनाचा धडा... 

युवराज यादव

यूँ ही बे-सबब न फिरा करो, कोई शाम घर में भी रहा करो 
कोई हाथ भी न मिलायेगा, जो गले लगोगे तपाक से 
ये नये मिजाज का शहर है, जरा फासले से मिला करो.... 

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला... आणि त्याचदरम्यान वॉटसऍपवर वाचलेल्या एका अज्ञात कवीच्या या ओळी मनात घर करून गेल्या. जगभरातील अनेक देशांमध्ये या विषाणूने थैमान घातले आहे. भारतानेही त्याच्याशी लढण्यासाठी आपल्या बाह्या सरसावल्या; आणि क्षणार्धात चावी फिरवावी तशी साऱ्या देशाच्या रहाटगाड्याची चाकेच थांबली. अत्यावश्‍यक सेवा वगळता सारे व्यवहार, उलाढाली ठप्प झाल्या. नाही म्हणायला कुठे कुठे कुरबुरी सुरू असल्याचे; कुठे या साऱ्या घडामोडींना काही वेगळे रंग देण्याचे प्रयत्न चाललेले दिसतात. काहींना विशेषत: मजुर वर्गाला लॉकडाऊनचा त्रास होतोय. पण बहुतांश भारतीय आपापल्या घरात बंद झाला. कोरोनामुळे किती हानी झाली, आर्थिक स्थिती किती बिघडली, त्याचे परिणाम काय भोगावे लागतील हे सारे यथावकाश कळेलच; पण या अतिसूक्ष्म जीवाने मनुष्य प्राण्याला काही धडे नक्‍कीच शिकवले आहेत... 

पहिला धडा : अनेक लोकांचा गर्व कमी झाला, जीवाची किमत मोठी आहे हे कळले. "पैसा, कार, बंगला आहे; पण सध्या खायला काही नाही. चालतच जावं लागतंय', हे सांगलीजवळ मजुरांबरोबर चालत येणाऱ्या एका व्यक्‍तींचे बोल खूप काही सांगून जातात. पैशांची उधळपट्टी, हॉटेलिंग, ऑनलाईन ऑर्डर देऊन खायचे बंद झाल्याने, अनेकांना घरची चव चाखायला मिळाली आहे. घरच्या घरीच चांगले चांगले पदार्थ घरीही बनू शकतात याची अनुभूती अनेकांना विशेषत: युवा वर्गाला आलीच असणार. जगात सुरक्षित ठिकाण हे घरच, खायला अन्न आणि मायेची माणसं लागतात. पैसे शिजवून खाता येत नाहीत. यामुळे गृहिणीची किंमतही कळली आणि अनेकजण स्वत: तिला मदतही करू लागलेत. प्रत्येक गोष्टीला ब्रॅंड पाहिजेच. ही मानसिकता कमी झाली, कमीत कमी वस्तू वापरुन जीवन जास्त छान जगता येते, याची अनुभुती अनेकांना येतच असणार. 

दुसरा धडा : अत्यावश्‍यक सेवांची किंमत कळाली. दूधवाला, भाजीवाली यासारख्या जगण्याशी निगडित वस्तू पुरवणाऱ्यांना अनेकजण तुच्छ वागणूक देत असू. आज या वस्तू मिळाल्या नाहीत तर काय होते याचा अनुभव आला. यातून शेतकरी हाच जगाचा खरा पोशिंदा आहे, हेही अधोरेखीत झाले. कारण त्याचे काम चालूच आहे, त्याने स्वत:ला शेतातच क्‍वारंटाईन करून घेतले आहे. 

तिसरा धडा : निसर्गच सर्वश्रेष्ठ आहे. सारे त्याच्यासमोर सर्व समान आहेत. विकसनशील, अविकसित देशांच्या जुन्या परंपरा श्रेष्ठ ठरल्या; बड्या देशांतील साऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधा एकाक्षणी तोकड्या झाल्या. भारतासारख्या देशातील बीसीजी लसीकरण सहाय्यकारी ठरली. गाड्या, कारखाने थांबल्याने प्रदुषणामुळे निसर्गाच्या होत असलेल्या हानीला काहीकाळ तरी ब्रेक मिळाला; पक्ष्यांचा कोलाहल पुन्हा ऐकू येऊ लागला. माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत, हा गैरसमज आहे, हे निसर्गाने समजावून सांगितले.

याशिवाय इतरही व्यक्‍तीगणिक वेगवेगळे धडे कोरोना शिकवत आहे. सध्या निवांत वेळ आहे, प्रत्येकाने एखाद्या सायंकाळी खुर्चीत शांत बसून लॉकडाऊने आपल्याला काय शिकवले याचा विचार करावा. "हे दिवस जातील'च, पण त्यानंतर पुन्हा स्वैरपणे सारे ओरबाडत फिरायचे जगण्याचा खरा अर्थ शोधायचा हे आपणच ठरवायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Corruption News : पैसा डबल करण्याच्या आमिषाला पोलिसही बळी; एसपींच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांची नावे समोर, घटनेने खळबळ

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

VIDEO : 'गावातील अंबानी शेतकऱ्याचं घर'! 20 एकरातील आलिशान घर पाहून नेटकरीही थक्क; गाड्यांपासून घोड्यांपर्यंत सर्व काही इथे आहे...

Viral Video: किती गोड! आजोबांनी रेल्वेत आजीसाठी केलं असं काही... व्हायरल व्हिडिओ पाहून आनंदाश्रू उभे राहतील

'त्याने माझे खराब व्हिडिओ पोस्ट केले होते' सोशल मीडियाचा अनुभव सांगताना प्राजक्ता माळी म्हणाली...

SCROLL FOR NEXT