Let's choose ... the national butterfly! 
Blog | ब्लॉग

चला निवडूया... राष्ट्रीय फुलपाखराला !

युवराज यादव

"छान किती दिसते... फुलपाखरू...' 
या कवितेबरोबरच अगदी बालवयातच फुलपाखराच्या मोहमयी रूपाचे आकर्षण जडते. वयोपरत्वे ते वाढतच जाते... वय कोणतेही असो, समोर फुलपाखरू आले की, सुखद संवेदना चेहऱ्यावर तरळते. चिमुकल्यांच्या जगतातला तर तो आनंदमित्रच... ही फुलपाखरे अभ्यासकांचेही खास आकर्षण. त्यांच्यामुळेच अनेक नवनव्या फुलपाखरांच्या प्रजातीचा शोध लागला आहे. मात्र, आता त्यांनी एक वेगळाच उपक्रम राबवला आहे. तो म्हणजे राष्ट्रीय फुलपाखरू निवडण्याचा. 

आपल्याकडे राष्ट्रीय प्राणी, पक्षी आहेत. मात्र, प्रथमच राष्ट्रीय फुलपाखरू निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तीही सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागातून... 
सध्या भारतात सुमारे 1500 फुलपाखरांच्या ज्ञात जाती आहेत. तज्ज्ञांच्या एका पथकाने फुलपाखरांचा सर्व्हे सुरू केला. या सुंदर जीवाची सध्याची स्थिती आणि पर्यावरणातील महत्त्व जाणून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला. यादरम्यानच राष्ट्रीय फुलपाखराची निवड करण्याचा विचार समोर आला. मग देशभरातील अभ्यासकांशी विचारविनिमयानंतर फुलपाखरांची सूची तयार करण्यात आली. त्यानंतर 50 तज्ज्ञांच्या अंतर्गत मतदानातून सात अंतिम फुलपाखरांची यादी तयार करण्यात आली आहे. या सात फुलपाखरांतून राष्ट्रीय फुलपाखराची निवड करण्यात येईल. विशेष म्हणजे, ही निवड सामान्य नागरिकांच्या मतदानातून करण्यात येणार आहे. अशाप्रकारे राष्ट्रीय प्रतीक निवडण्याचा हा पहिलाच प्रयोग असेल. 

राष्ट्रीय फुलपाखरू बनण्याच्या या स्पर्धेत सात तगडे दावेदार उतरले आहेत. कृष्णा पिकॉक, कॉमन जेजबेल, ऑरेंज ओकलीफ, फाईव्ह बार सोर्ड टेल, कॉमन इंडियन नवाब, यलो गोर्गन आणि नॉर्दन जंगल क्‍वीन यांचा त्यामध्ये समावेश आहे. सुंदरतेबरोबर त्यांच्या विविध गुणधर्मांसह इतरही काही निकष यांच्या निवडीसाठी लावले होते. याशिवाय त्यांच्या प्रजाती ना अतिदुर्मिळ असाव्यात आणि अतिसामान्यही नसाव्यात, असाही विचार तज्ज्ञांनी अंतिम सूची तयार करताना केला आहे. 
आता आपल्याला या सात अतिसुंदर फुलपाखरांमधून निवड करायची आहे. http://tiny.cc/nationalbutterflypoll या लिंकवर जाऊन आवडीच्या फुलपाखराला मतदान करायचे आहे. विशेष म्हणजे आपण एकावेळी दोन फुलपाखरांना मतदान करू शकतो. 10 सप्टेंबरपासून सुरू झालेली ही ऑनलाईन मतदान प्रक्रिया 8 ते 10 ऑक्‍टोबरपर्यंत चालणार आहे. आयोजकांना कमीत कमी दीड ते दोन लाख लोकांनी मतदान करावे, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर सर्वाधिक मतदान झालेल्या फुलपाखरांची सूची आणि यासंदर्भातील प्रस्ताव पर्यावरण आणि वन मंत्रालयाला देण्यात येणार आहे. त्यानंतर तज्ज्ञांची समिती राष्ट्रीय फुलपाखराची निवड घोषित करेल. साधारणपणे नव्या वर्षात आपल्याला राष्ट्रीय फुलपाखरू मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

पर्यावरणीय महत्त्व आणि संकट 
सुंदरतेचे प्रतीक असलेले फुलपाखराचे पर्यावरणातही तितकेच महत्त्व आहे. मुख्य म्हणजे निकोप पर्यावरणाचे तो एक द्योतक आहे. सध्या जंगले नष्ट केली जात असल्यामुळे, तसेच कीटकनाशके आणि जल-वायू प्रदूषणामुळे ही फुलपाखरे संकटात आहेत. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी जनजागृतीचा उद्देशही या उपक्रमामागे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT