Look At Waste As Wealth Rajendra Ghorpade Article  
Blog | ब्लॉग

कचऱ्याकडे संपत्ती म्हणून पाहा ! 

राजेंद्र घोरपडे

वाढता कचरा हा मानवी आरोग्यासाठी धोक्‍याचा इशारा आहे. त्यासाठी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. त्यावर सध्या विविध प्रयोग होत आहेत. कचऱ्यावरील प्रक्रियेवरूनच घनकचऱ्याचे चार मुख्य प्रकार पडतात. सेंद्रिय कचरा, रुग्णालय कचरा, विषारी कचरा, पुनर्वापर करता येणारा कचरा असे हे प्रकार आहेत. 

सेंद्रिय कचऱ्यात अन्न, फुले, पाने, फळे आदींचा समावेश होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्‍य आहे. रुग्णालयातील कचऱ्यात वापरलेले मास्क, कापूस, वापरलेले टिश्‍यू, रक्ताचे कपडे, पीपीई किट आदींचा समावेश होतो. विषारी कचऱ्यात टाकाऊ औषधे, रसायने, बल्ब, बॅटरी आदींचा समावेश होतो. पुनर्वापर कचऱ्यात पेपर, काच, प्लास्टिक वस्तू यांचा समावेश होतो. या कचऱ्याचे करायचे काय, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. त्यावर मात करण्यासाठी त्याचा पुनर्वापर किंवा प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे. त्यातून अनेक चांगले उपक्रम आता पुढे येताना पाहायला मिळत आहेत. रोजगार निर्मितीसह यातून उद्योगही उभे राहू शकतील. 

सेंद्रिय कचऱ्यापासून खतनिर्मितीचा उद्योग विकसित होत आहे. शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करून त्याची विक्रीही केली जाते. बिहारमधील महाबोधी मंदिरात देवास अर्पण केलेल्या फुलांपासून नैसर्गिक रंगांची निर्मिती केली जात आहे. त्यासाठी कचऱ्याकडे संपत्ती म्हणून पाहायला हवे. पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर समस्या सहज सुटू शकतात. 

कचरा जाळल्यावर निर्माण होणाऱ्या उष्णतेतून वीजनिर्मितीचेही प्रयोग केले जात आहेत. यात विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे काही मर्यादा आहेत. पण, मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हे गरजेचे आहे. टाकाऊ टायरपासून पायरोलायरीस प्रक्रियेतून इंधननिर्मितीही करता येते. सुमारे 45 ते 50 टक्के इंधन, 10 ते 15 टक्के स्टील वायर, तर 30 ते 35 टक्के कार्बन पावडर टायरपासून मिळते. अंड्याच्या कवचापासून हायड्रोझायपेटाईट प्रक्रियेतून कृत्रिम हाडांची निर्मिती शक्‍य आहे. अंड्याचे कवच म्हणजे CaCo3 याची TiO2 चा संयोग करून CaTiO3 मिळविता येऊ शकते. त्याचा उपयोग न्यूक्‍लिअर कचऱ्यावरील प्रक्रियेत करता येणे शक्‍य आहे. 

प्राचीन रंग पर्यावरणपूरक टिकाऊ 
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्रा. डी. एस. भांगे याविषयी म्हणाले, की प्राचीन काळात वनस्पतीच्या पाने, फुलांपासून रंग तयार केले जात होते. ठराविक प्रकारच्या चिकणमातीबरोबर फुले उकळल्यास किंवा तापविल्यास मिश्र किंवा संकरित रंगद्रव्य बनते. प्राचीन माया संस्कृतीत माया निळ किंवा माया ब्लू नावाने रंगद्रव्य हे अशाच प्रकारचे होते. ही रंगद्रव्ये प्रकाश, रासायनिक द्रव्ये आणि उष्णताविरोधी असतात. हे रंग अधिक काळ टिकतात. वेगवेगळ्या चिकणमातीचा वापर करून अशा पर्यावरणपूरक, टिकाऊ रंगांच्या निर्मितीसाठी सखोल संशोधनाची गरज आहे. सर्व प्रकारच्या कचऱ्यातून अशीच नवनिर्मिती शक्‍य आहे. यात संशोधनाच्या मोठ्या संधीही आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT