Indo Pacific Ocean esakal
Blog | ब्लॉग

Indo Pacific Ocean: हिंद-प्रशांत महासागरातील स्पर्धा वाढणार, चीनविरोधात अमेरिका,भारत,ऑस्ट्रेलिया,जपान एकत्र

चीनच्या अरेरावीला आळा घालण्यासाठी हिंद-प्रशांत महासागरातील मार्ग खुले राहावे,

विजय नाईक,दिल्ली

येत्या काही वर्षात हिंद-प्रशांत (इंडो-पॅसिफिक) महासागरातील स्पर्धा वाढणार आहे. दक्षिण चीनी समुद्र व पूर्व चीनी समुद्र यावर चीनने हक्क दाखवायला व विशेषतः दक्षिण चीन समुद्रातील बेटांवर सामरिक बांधणी सुरू केल्यापासून महासागरी व्यापार मार्ग धोक्यात येतील काय, अशी शंका जगात सर्वत्र व्यक्त केली जात आहे. चीनच्या अरेरावीला आळा घालण्यासाठी हिंद-प्रशांत महासागरातील मार्ग खुले राहावे, यासाठी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, ब्रिटन, फ्रान्स एकत्र आले आहेत.

एप्रिलमध्ये `द इकॉनॉमिस्ट’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखातील या संबंधातील माहिती उद्बोधक आहे. त्यात म्हटले आहे, की हिंद-प्रशांत महासागराच्या परिसरातील देशांचे सकल देशांतर्गत उत्पादन ( जीडीपी) जगाच्या एकूण जीडीपीपैकी 12 टक्के असून त्यातील तीसपेक्षा अधिक देशांचे जीवन, अर्थव्यवस्था, सुरक्षा या महासागरांवर अवलंबून आहे. या परिसरातील देशांची लोकसंख्या 2.6 अब्ज आहे.

हिंदी महासागराचा विस्तार आफ्रिकेपासून ते मलेशिया, सिंगापूर व इंडोनेशियाची मलाक्का सामुद्रधुनी व पर्शियन आखात ते नैऋत्य ऑस्ट्रेलियापर्यंत आहे. हिंदी महासागरील सर्वात निमुळते व जोखमीचे तीन मार्ग आहेत. 1) पर्शियन आखातातील होर्मुझ सामुद्रधुनी. खनिज तेलाचा जगातील दोन तृतीअंश व्यापार या सामुद्रधुनीमार्गे जातो. 2) बाब अल मंदाब सामुद्रधुनी. एका बाजूस हॉर्न ऑफ आफ्रिका (आफ्रिकेचे भुशीर) अरबी द्वीपकल्प, एरित्रिया व जिबुती हे देश व दुसऱ्या बाजूस येमेन आहे.

तेथून लाल समुद्र व सुएझ कॅनॉलचा मार्ग खुला होतो व 3) मलाक्का सामुद्रधुनी ही हिंदप्रशांत महासागरातील सर्वात निमुळती केवळ 2.7 कि.मी रूंदीची आहे. तिच्या एका बाजूला सिंगापूर व दुसऱ्या बाजूला सुमात्राचा प्रदेश आहे. त्यातून जगाचा एक पंचमांश व्यापार चालतो. त्यापैकी होर्मुझ व बाब अल मंदाब या सामद्रधुनी सर्वाधिक असुरिक्षित मानल्या जातात.

हॉर्न ऑफ आफ्रिका नजिकचा समुद्र इस्लामी दहशतवाद, चाचेगिरी यासाठी प्रसिद्ध असून होर्मुझची सामुद्रधुनी इराणच्या वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्या व त्यातून जाणाऱ्या जहाजांवर होणारे हल्ले यामुळे असुरक्षित झाली आहे. या सामुद्रधुनीवर आपले वर्चस्व गाजविणायासाठी इराण आता दोन जहाजांना तयार करीत असून त्यावर अत्याधुनिक कामिकाझ ड्रोन्स तैनात करण्यात येणार आहेत. ऱशिया सध्या ही ड्रोन्स युक्रेनवरील हल्ल्यांसाठी वापरीत आहे.

त्यातून शत्रूवर अचूक हल्ला करता येतो. या दोन सामुद्रधुनींच्या मानाने मलाक्का सामुद्रधुनी अधिक सुरक्षित असली, तरी तेथून जाणाऱ्या जहाजांवर जगातील सर्वाधिक चाचेगिरी होत असल्याचे दिसून येत आहे. जगातील एकूण खनिज तेलाच्या व्यापारापैकी चार पंचमाश व्यापार या सामुद्रधुनीतून होतो. या भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर अमेरिका तेलाच्या वहन व व्यापारात अडचणी उभ्या करू शकते, अशी दाट शंका चीनला आहे. इंडोनेशिया व सिंगापूर ही दोन्ही अमेरिकेची मित्र राष्ट्रे आहेत.

अमेरिका व चीनच्या तणावाचा परिणाम आपल्या सागरी व्यापार व अर्थव्यवस्थेवर होईल, ही हिंद-प्रशांत महासागराच्या काठावरील देशांची चिन्ता रास्त आहे. ही राष्ट्रे एकीकडे अमेरिका व मित्र राष्ट्र व दुसरीकडे चीन, रशिया व त्यांची मित्र राष्ट्र यात विभागली गेली आहेत. चीनला आवर घालण्यासाठी भारत, जपान, ऑस्ट्रेलिया व अमेरिका यांनी एकत्र येऊऩ क्वाड ही संघटना स्थापन केलीय.

तसेच, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन व अमेरिका यांनी औकुस नावाची आणखी एक संघटना स्थापन केलीय. प्रशांत महासागरातील फ्रेन्च पॉलिनेशिया फ्रान्सच्या नियंत्रणाखाली आहेत. तसेच, मोझांबिक नजिकचे रियुनियन हे हिंदी महासागरातील बेट फ्रान्सच्या अधिपत्याखाली आहे. दोन्ही महासागरात फ्रान्सचे हितसंबंध गुंतलेले आहेत. ब्रिटन व फ्रान्सची आरमारे संयुक्तपणे सागरी टेहाळणी करीत असतात.

एकीकडे, पन्नास वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पहिल्या आरमाराचे (फर्स्ट फ्लीट) पुनरूज्जीवन ते हिंदी महासागरात तैनात करण्याचा विचार अमेरिका करीत आहे. या आरमारात एकूण तीनशे जहाजे होती. पेन्टॅगॉनने त्यांची संख्या 350 पर्यंत वाढविण्याचे ठरविले आहे. दुसरीकडे, हिंद महासागराच्या टेहाळणीसाठी एक स्वतंत्र आरमार उभारण्याचा चीन विचार करीत आहे. चीन हा जहाजांच्या संख्येच्या दृष्टीने जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असून, 2021 मध्ये चीनकडे असलेल्या जहाजांची संख्या 1 लाख 25 हजार 900 होती. त्यातील युद्धसज्ज जहाजांची संख्या 340 आहे.

हिंदी महासागरात पाय रोवण्यासाठी चीन पाकिस्तानमधील ग्वादार व श्रीलंकेतील हंबनटोटा या बंदरांचा वापर करणार, हे निश्चित. शिवाय म्यानमारमधील कोको बेटावरही चीनने रडार तळ बांधण्याचे काम सुरू केले आहे. ग्वादार व हंबनटोटा दोन्ही बंदरे भारताच्या निकट असल्याने भारताला चीनचा धोका या बंदरातून उपस्थित होऊ शकतो. या शिवाय तांझानियातील बागामायो बंदराचा व्यापारासाठी व अस्तेअस्ते नाविक तळासाठी उपयोग करण्याचा चीनचा विचार आहे.

तांझानियाच्या उत्तरेस भौगोलिकदृष्ट्या व्यूहात्मक अससेल्या जिबुती या देशाकडे साऱ्याच महत्वाकांक्षी देशांची ओढ सुरू आहे. या देशात जर्मनी, स्पेन, इटली, फ्रान्स, अमेरिका, सौदी अरेबिया, ब्रिटन या राष्ट्रांचे नाविक तळ आहेत. 2016 मध्ये चीनने तेथे नाविक तळ स्थापन केला.

हिंद-प्रशांत महासागरात भारताचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी जपानचे प्रयत्न सुरू असून त्याच दृष्टीने अलिकडे जपानचे पंतप्रधान किशिडा फुमिओ यांनी भारताला दिलेल्या भेटीत त्यासाठी 75 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.

चीनच्या आरमाराच्या मानाने भारताचे आरमार निम्मे आहे. चीनकडे 340 युद्धसज्ज जहाजे व पाणबुड्या आहेत. तर भारताकडे अंदाजे 150 युद्धसज्ज जहाजे व पाणबुड्या आहेत. याकडे पाहता, चीनच्या आरमारी शक्तीला आव्हान देणे एकट्या भारताला अथवा अऩ्य कोणी एकट्या राष्ट्राला शक्य होणार नाही. म्हणूनच, हिंद-प्रशांत महासागराच्या सुरक्षेसाठी जगातील अऩेक देश पुढे आले आहेत. येत्या काही वर्षात या स्पर्धेला आणखी धार येणार, असेच दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT