Mushayra of "Ghazalsad" is going on every day for three years on What's app! 
Blog | ब्लॉग

तीन वर्षे रोजच रंगतोय "गझलसाद'चा मुशायरा!

युवराज यादव

गझलसम्राट सुरेश भट यांच्या जन्मदिनानिमित्त 15 एप्रिलला "याची' मुहूर्तमेढ रोवलेली... त्यासाठी सर्वांच्या सोयीने 12 एप्रिल रोजी साऱ्यांनी भेटायचे ठरले होते... तिथे सुरेश भटांच्या गझलविधेच्या साथीनेच या "ग्रुप'चा तिसरा वर्धापन दिन साजरा होणार होता आणि मुशायराही रंगणार होता. मात्र अचानक सारे लॉकडाऊन झाले अन्‌ वर्धापनदिन "ग्रुप'वरच साजरा झाला... भेटता नाही आले इतकेच! 
"गझलसाद' ग्रुप म्हणजे कोल्हापूर, सांगली परिसरातील गझलकारांसाठी एक व्यासपीठ बनले आहे. सुरवातीच्या काळात निमंत्रक नरहर कुलकर्णी, हेमंत डांगे, प्रसाद कुलकर्णी, श्रीराम पचिंद्रे, डॉ. सुनंदा शेळके आदी गझलकारांनी एकत्र येण्याचे ठरले. पहिला मुशायरा नरहर कुलकर्णींच्या घरीच झाला आणि तिथेच सुरेश भट यांना अभिवादन करून "गझलसाद'ची शमा तेवती झाली. हळू हळू अनेक नवे-जुने गझलकार, कवी या छंदमयी दुनियेचे हमसफर झाले. लोग जुडते गये... कारवॉं बनता गया... आणि मुशायरा रोजचाच रंगू लागला... 

गझलेचे घर बांधायाला जमीन आधी तू शोधावी 
सुरवातीला साधी सोपी वृत्ते हाताळावी... 
(प्रसाद कुलकर्णी) 

असे म्हणत गझलेचा क्‍लास सुरू होतो. गझल जमली, खयाल सुचला की तो इथे टाकला जातो. सारे मग त्याला दाद देतातच. त्याचबरोबर त्यावर चर्चाही रंगते... इस्लाह केली जाते... शब्द, छंद, वृत्त, मात्रांची बेरीज- वजाबाकी होते... एकूण काय सारे गझलमय वातावरण... काही सुधारणाही सुचवली जाते. सारे "गझलवृत्ती'ने स्वीकारतात. 

बसतो निवांत जेव्हा घरट्यात रोज माझ्या 
येतो निसर्ग आता दारात रोज माझ्या...  
(नरहर कुलकर्णी) 

आयुष्याच्या वाटेवरती जरी उमलले काटे 
आनंदाने उचलून घ्यावे ज्याचे त्याचे वाटे...
(हेमंत डांगे) 

"कोजागिरीचे लूट चांदणे' चंद्र म्हणाला 
काळजातल्या चांदण्यास अन मोहर आला...
(डॉ. सुनंदा शेळके) 

माझ्याच सावल्यांनी केलेत वार झारे 
मागू कुणा प्रकाशा, तारे पसार सारे.....
 (सारीका पाटील) 

अशा एकापेक्षा एक सरस गझल पेश होऊ लागतात. अनेक गझलकार यात सहभागी आहेत. सर्वांची नावे उद्‌धृत करणे इथे शक्‍य नाही. मात्र सर्वांच्याच गझल, शेरांची आहुती या यज्ञात पडते आहे. त्यामुळेच तो तीन वर्षे अव्याहतपणे धगधगतो आहे. महिन्या दोन महिन्यांतून मग ग्रुपवरच भेटायचे ठरते. वेळ, ठिकाण, स्थळ निश्‍चित होते... वेळात वेळ काढून बहुतांश सदस्य एकत्र येतात, काही श्रोतेही जमतात आणि लाईव्ह मुशायराही जमतो... श्री. कुलकर्णी, श्री. डांगे यांच्या घरी सुरवातीचे मुशायरे झाले. आता मात्र सुभाष नागेशकर यांचे विविध पेंटिग्जनी सजलेले कलापूर्ण घर गझलघरच जणू बनले आहे. कोल्हापूरशिवाय जयसिंगपूर, बेळगाव, इचलकरंजी, कुरुंदवाड, आजरा इथेही वेगवेगळ्या निमित्ताने मुशायरे झाले आहेत. यानंतर आता आपले फेसबुक पेजही तयार करण्याचा "गझलसाद'चा संकल्प आहे. लॉकडाऊननंतर लवकरच तेथेही गझलेचे हे नवे व्यासपीठ रसिकांसाठी खुले होईल, अशी आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT