ना. धों.महानोर Sakal
Blog | ब्लॉग

Blog : शेती जगणारं व्यक्तीमत्व : ना. धों. महानोर

सकाळ डिजिटल टीम

माझ्या आयुष्यातील अखेरचा श्वास मला घ्यायचा असेल तर तो शेतात असावा, माझ्या शेतीतील मातीच्या कुशीत यावा आणि मरणानंतर त्या मातीमध्ये मला विलीन होऊ द्यावं... अशी इच्छा बाळगणारे शेतकवी... शेतीवर कविता करणारे असंख्य भेटतील पण एखाद्या शेतकऱ्याने शेतीच्या कविता कराव्यात आणि सामान्यांपासून साध्या शेतकऱ्याला देखील रुचाव्या असे शेतकवी बोटावर मोजण्याएवढेच आणि त्यातील एक शेतकवी, निसर्गकवी म्हणजे ना. धों. महानोर होय...

हेच महानोर गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय. ते ८१ वर्षांचे होते.

शेती हे महानोरांचं पहिलं प्रेम होतं. या शेताने त्यांना असा लळा लावला की, सुख दुःखाला परस्परांशी हसलो रडलो.. आता तर जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो..’ ही त्यांची बोली. त्यांची शेतीविषयाची आत्मकथा "या शेताने लावला लळा" ही देखील चांगलीच प्रसिद्ध आहे.

या आत्मकथेत महानोरांनी शेतीत वापरलेली नवं तंत्र, नवी पीकपद्धत याचा उल्लेख केला. पाणी साठवणीचे नाना प्रयोग केले आणि शेती बहरत गेली. विकासाची हि गंगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचावी, यासाठी सरकारच्या पाठीशी लागून प्रयत्न करत राहिले आणि त्यांच्या या अनुभवातून कळलेलं शेती-पाण्याचं ज्ञान समाजाला द्यावं, या हेतूने सांगितलेली ही त्यांची शेतीशी संबंधित आत्मकथा अनेकांना भावली.

फक्त शेतकरी नव्हे तर साहित्यिक आणि राजकारणतला महानोरांचा प्रवास उल्लेखनीय आहे. त्यांनी शेतीच्या फक्त कविता केल्या नाही तर त्या जगल्या आणि शेतकऱ्यासाठी लढले देखील. १९७८ साली राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये महानोर देखील होते. आमदार झालेल्या महानोरांनी विधानपरिषदेत शेतकऱ्यांचा प्रश्नांना हात घातला. अनेक प्रस्ताव देखील मांडले.

महानोरांनी पळसखेड्याला २६ सिमेंट बंधारे, २६ दगडी बंधारे, ३ तलाव बांधून घेतले. २१० एकरवर सामाजिक वनीकरणाचा कार्यक्रम राबवला. माती अडवली, पाणी जिरवलं, ३६ हजार झाडं लावली, ती जगवली. आजही तो शेतीच्या विकासातील एक महत्त्वाचा प्रयोग मानला जातो.

महानोरांना १९८५ साली महाराष्ट्र शासनाच्या कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. राजकारणातून बाहेर असताना देखील त्यांनी शेतीचे अनेक प्रश्न मांडले आहेत.

साहित्याच्या रुपातील निसर्ग आपल्याला भेटला तो महानोरांच्या लेखणीमुळे, त्यांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या गाण्यांमुळेच त्यांनी चित्रपटासाठी लिहलेली गाणी आजदेखील लोकांच्या ओठी रेंगाळतात. असा हा निसर्गप्रेमी, शेतकऱ्यांसाठी बोलणारा, निसर्गाला शब्दात पकडणारा शेतकवी आज अनंतात विलीन झाला.

- संजना हेब्बाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fare Hike: बसमधून प्रवास करणे महागणार! प्रवासात खिसा रिकामा, मिरा-भाईंदर पालिकेचा बस भाडेवाढीचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

SCROLL FOR NEXT