process of plasma therapy on corona patient  
Blog | ब्लॉग

कोरोनाला हरवण्यासाठी अशी होते प्लाज्मा थेरपी....

राहुल पाटील

कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. देशात रुग्णसंख्येत वाढ होत असून, रोज येणारी आकडेवारी चिंता वाढवत आहे. शिवाय, अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. या महाभयानक संकटाची जगावर टांगती तलवार असल्याचे स्पष्ट होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते जगभरात 80 वेगवेगळे गट कोरोना लसीवर संशोधन करीत आहेत. असे असताना सध्या 'प्लाज्मा थेरपी'ची चर्चा सतत कानी पडत आहे. काय आहे ही थेरपी? 'प्लाज्मा' डोनेटसाठी का पुढाकार घ्यायला हवा? याबाबत थोडेसे...

फूड ऍण्ड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशननुसार (FDA) अनेक वर्षांपासून या थेरपीचा उपयोग केला जातो. याआधीही अनेक रोगांच्या निपटाऱ्यासाठी या थेरपीचा वापर झाला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, त्याचा प्रभाव दिसण्यासाठी रुग्णाची चिकित्सा गरजेची आहे. सीपीआर मेडिसीन विभागाचे असिस्टंट प्रोसेसर डॉ. वरुण बाफना यांच्या मते, 'कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाल्यावर 'प्लाज्मा थेरपी' होते. रक्तदानासारखीच ही प्रक्रिया असते. या प्रक्रियेचा दात्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. अफ्रेशीस मशिनद्वारे (Apheresis) ही प्रक्रिया होते. दात्याकडून रक्त काढले जाते. या मशिनमध्ये रक्त फिल्टर होते. लाल, पांढऱ्या, पिवळ्या पेशी पुन्हा शरीरात जातात. या वेळी केवळ प्लाज्मा वेगळा होतो व तो घेतला जातो. शरीरात पाच ते सहा लिटर प्लाज्मा असतो. एका रुग्णाकडून साधारण 500 मिली प्लाज्मा घेतला जातो आणि तो कोरोना बाधिताला दिला जातो. ही सर्व प्रक्रिया अफ्रेशीस मशिनद्वारेच होते.''

आता प्रश्‍न पडतो, की प्लाज्मा कोण देऊ शकतो? तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णालाच प्लाज्मा देता येतो. मात्र, त्याचे वय 18 ते 60 दरम्यान असावे. शिवाय, 50 किलोपेक्षा जास्त वजन असावे. तसेच, एकपेक्षा जास्त प्रसूती झालेल्या महिलेला प्लाज्मा दान करण्याची परवानगी दिली जात नाही. आता प्लाज्माचा प्रभाव कुणावर होतो, हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे. डॉ. बाफना यांच्या मते, ऑक्‍सिजनची मात्रा ज्यांची कमी होते, धाप जास्त लागते त्यांना प्लाज्मा दिल्यास उपयोगी ठरते. थेरपीनंतर तिसऱ्या दिवशी कोरोना व्हायरस मरू शकतो. मात्र, जास्त गंभीर रुग्ण बरा होण्याची शक्‍यता धूसर असते. कारण फुपफुसावर व्हायरसने किती अटॅक केला आहे, त्यावर त्या रुग्णाची रिकव्हरी ठरते. ज्या रुग्णांत कोरोनाचा अतिप्रभाव झाला आहे, अशा रुग्णावर प्लाज्मा थेरपीचा प्रभाव होण्यास वेळ लागतो. शिवाय, तशी शक्‍यताही कमी असते. किमान पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असताना थेरपी झाली तरच फायदा होतो. रोगप्रतिकार शक्तीमुळे आपला जीव वाचला, इतरांचाही वाचावा यासाठी कोरोनातून बरे झालेल्यांनी प्लाज्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.
 

कोल्हापूरमध्ये साधारण 25 वर लोकांनी प्लाज्मा दान केला आहे; परंतु जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता महिन्याला किमान 60 बॅगची आवश्‍यकता आहे. त्यामुळे जे कोरोनातून धडधाकट होताहेत, थेरपीच्या नियमांत बसताहेत, त्यांनी प्लाज्मा थेरपीसाठी पुढे येण्याची आवश्‍यकता आहे.
- डॉ. वरुण बाफना, असिस्टंट प्रोफेसर,
मेडिसीन विभाग, 'सीपीआर'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT