Shiv Sena leader Anand Dighe esakal
Blog | ब्लॉग

Anand Dighe Anniversary : धर्मवीर दिघेंनी शिवसेना सोडली असती का? बाळासाहेबांना सोडलं असतं का?'

'त्यांनी शिवसेनेशी आणि बाळासाहेबांशी प्रतारणा अजिबात केली नसती.'

सकाळ डिजिटल टीम

Shiv Sena Crisis : दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे (Anand Dighe) आणि मातोश्रीमध्ये 2000/2001 च्या दरम्यान काही कुरबुरी सुरु होत्या का? तर होय.. तशी काही वृत्त ठाण्यात आमच्यापर्यंत पोहचत होती. वर्तमानपत्रांमधूनही काही बातम्या यायच्या.

आम्हा शिवसैनिकांमध्ये त्याबाबत दबक्या आवाजात काही कुजबुज सुरु असायची. पण, मग दिघेंनी शिवसेना सोडली असती का? बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) सोडलं असतं का? तर, तसं वाटत नाही. ते बाळासाहेबांना त्यांचं दैवत आणि मीनाताई ठाकरेंना आईच्या जागी मानत होते.

'बाळासाहेबांकडे आपली नाराजी व्यक्त केली असती'

शिवसेना (Shiv Sena) हा त्यांचा श्वास होता. खरोखरच काही मतभेद असले असते आणि ते सहन होण्यापलीकडचे असते तर एकतर त्यांनी सरळ जाऊन बाळासाहेबांकडे आपली नाराजी व्यक्त केली असती आणि त्यातूनही काही समाधानकारक मार्ग निघाला नसता, तर ते कदाचित पदावरून बाजूला झाले असते; पण त्यांनी शिवसेनेशी आणि बाळासाहेबांशी प्रतारणा अजिबात केली नसती.

'पराकोटीचं वैमनस्य निर्माण झालं होतं'

असं मी जे काही त्यांना किमान पंधरा वर्षे ओळखत होतो, त्यातून वाटतं. त्यांच्या अकाली आणि आकस्मिक जाण्यानंतर तब्बल वीस-बावीस वर्षांनी त्यांच्या मृत्यूविषयी संशय निर्माण करणारी वक्तव्य करणं किंवा मातोश्री आणि त्यांच्यात जणू काही पराकोटीचं वैमनस्य निर्माण झालं होतं असं चित्र निर्माण करणं हे घाणेरडं राजकारण आहे.

'घाणेरड्या राजकारणाचा मानसिक त्रास होतो'

तुम्हाला काही पक्कं माहिती होतं किंवा संशय होता तर तब्बल वीस वर्षे तुम्ही गप्प का बसलात? असो.. स्व. आनंद दिघे यांच्यासोबत राहिलेल्या - काम केलेल्या माझ्यासारख्या अनेक लोकांना या सगळ्या वादांचा आणि घाणेरड्या राजकारणाचा मानसिक त्रास होतो, म्हणून हे लिहावंसं वाटलं.

Shiv Sena leader Anand Dighe

2001 साली आजच्याच दिवशी म्हणजे, 26 ऑगस्टला त्यांचं निधन झालं.

(त्यांच्यासोबतचा माझा हा फोटो - 2000 सालातील)

धर्मवीर आनंद दिघेंसोबतचा हा प्रसंग फेसबुक पोस्टव्दारे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकर (Ravindra Pokharkar) यांनी शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

SCROLL FOR NEXT