MS Dhoni.jpg 
Blog | ब्लॉग

मनाला चटका लावणारी धोनीची निवृत्ती...!

प्रशांत पाटील

सुनिल गावस्कर, कपिलदेव, दिलीप वेंगसरकर, कृष्णम्माचारी श्रीकांत, मोहम्मद अझरूद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, विरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, जहीरखान असे अनेक दिग्गज आवडते खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले. त्यावेळीही वाईट वाटलं होतं पण धोनीची निवृत्ती मात्र मनाला चटका लावणारी ठरली.  

धिरोदात्तवृत्ती, विनम्रता, कमालीचा संयम, अत्यंत कठीण परिस्थितीतही डोकं शांत ठेवायची क्षमता, शेवटपर्यंत लढण्याचा झुंजार बाणा, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती, नविन खेळाडूंना योग्य ती संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास जागवणारा राजामाणूस, त्याचप्रमाणे संघावर नैतिक दरारा ठेवणारी प्रसंगी कटु निर्णय घेण्याचे धाडस असणारी नेतृत्व शैली, पराभवाने खचायचं नाही, निराश व्हायचं नाही. आणि विजयाने हुरळुन ही जायचं नाही. कायम आपले पाय जमीनीवर आणि डोकं स्थिर ठेऊन वाटचाल करण्याची धोनीची स्थितप्रज्ञता कायम सगळ्याच्या स्मरणात राहील.
 
महेंद्रसिंग धोनी भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून रिटायर झाला. परंतु माझ्यासारख्या लाखो करोडो क्रिकेट चाहत्यांच्या हृदयातुन तो कधीच निवृत्त होणार नाही. आमच्या काळजातलं त्याच स्थान आकाशातल्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे कायम अढळ राहील. परंतु धोनीसारख्या महान खेळाडूची निवृत्ती अशा पद्धत्तीने व्हावी हे अत्यंत दुर्दैवी आणि क्रिकेटप्रेमींसाठी निराशाजनक आहे. धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीचा समारोप क्रिकेटच्या मैदानावरच व्हायला हवा होता. शेवटचा सामना खेळून उपस्थित प्रेक्षक आणि सर्व चाहत्यांना अभिवादन करून हात उंचावून आणि टाळ्यांच्या गजरात सन्मानाने निरोप घेणारा धोनी हे दृष्य पहायला मिळाले नाही. याची खंत कायम मनात राहील.
 
भारतीय क्रिकेट संघाचा चपळ आणि दक्ष-यष्टीरक्षक चिवट आणि आक्रमक फलंदाज असलेल्या एका शांत संयमी हुशार धाडसी आक्रमक यशस्वी कल्पक आणि सर्वोत्तम कर्णधाराच्या कारकिर्दिला मानाचा मुजरा. त्याचे पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे आणि समाधानाचे जावो ही मन:पुर्वक सदिच्छा...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : साई चरणी २० लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; साईभक्ताचा संस्थानकडून सन्मान

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT