मेघना 
Blog | ब्लॉग

रिप्‍लायच्‍या भानगडी...

मेघना जाधव, सातारा.

खरंतर या साध्या वाटणाऱ्या गोष्टीपण कधी कधी आपल्याला विचार करायला भाग पाडत असतात. मी पण विचार केला. बहुतांश लोकांना गुड नाईट किंवा गुड मॉर्निंगच्या मेसेजचा रिप्लाय देण्याचा खूप कंटाळा येतो. (त्यात माझाही सहभाग आहे) मग अशी लोकं एकतर मेसेज लवकर पहात नाहीत किंवा सकाळच्या गुड मॉर्निंगचा रिप्लाय डायरेक्‍ट रात्री गुड नाईट म्हणून देणे पसंत करतात. यामध्ये बऱ्याच गोष्टींची बचत होत असते, बरं का... 

काही वेळेस एखादा खूप उत्सुकतेने आपल्याला मेसेज करतो किंवा एखाद्या ग्रुपवर खूप छान वाचनीय अशी पोस्ट असते. आपण ती बघतो आणि वाचून रिप्लाय करेपर्यंत आपल्यासारख्या गरिबाला हॉटस्पॉट देणारे अचानक लई भाव खायला लागतात आणि फुकटचं वाटप बंद करतात. आता मात्र पंचायत होते... या नेटच्या गरिबीचा खूप म्हणजे खूप राग येतो आणि या सगळ्यात रिप्लाय देण्याचं राहून जातं. पण, या सगळ्याशी अनभिज्ञ असलेला पलिकडचा मात्र खूप हिरमसून जातो, रिप्लाय न आल्याने... 

असं नाही की नेहमीच गरिबी असते... आम्हीबी श्रीमंत होतो कधीतरी. पण नशीब नावाचा प्रकार फार भयानक..! अचानक रेंजच जाते ओ. 
काही वेळेस सगळं व्यवस्थित असतं पण झोप दगा देते... मोबाइल वगैरे सगळं सुरु असतं. पण, डोळ्यांच्या पापण्या जड होतात आणि रिप्लाय राहून जातो. घरातली लहान पोरं म्हणजे कहर... आपला मोबाईल घेऊन मोठ्या माणसासारखं व्हॉट्‌स ऍपवरचे मेसेज बिसेज चेक करतात. तेही आपल्या नकळत आणि यामध्ये आपल्याला मेसेज आलेलेच कळत नाही. त्यातूनही रिप्लाय राहून जातो. यासारख्या अजून बऱ्याच गोष्टी असतात. जसं की काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी आईची हाक, कुणाचातरी कॉल, अचानक दारावर आलेले पाहुणे आदी कारणांमुळे राहून जातो तो रिप्लाय... पण लोक ती गोष्ट मनाला लावून घेतात, नाती तोडण्याच्या गोष्टी करू लागतात... 

माणसानं छोट्या गोष्टींना मोठं बनवून उगीच स्वतःला, विचारांना छोटं करून घेण्यात कसला आलाय मोठेपणा..??  आपण मन मोठं करुन चालत रहायचं... एक रिप्लाय काय आपलं आयुष्य वाढवत नसतो किंवा कमीही करत नसतो... एक रिप्लाय खरंच इतका दुरावा निर्माण करू शकतो का..?? हा फक्त समजून घेण्याचा प्रश्‍न आहे आणि ज्यांना याचं उत्तर मिळतं, तो रिप्लाय आल्या गेल्याच्या भानगडीत पडत नाही... शेवटी रिप्लाय येवो न येवो आपली माणसं ही शेवटपर्यंत आपलीच राहतात... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT