sagar kamble young artist from kolhapur 
Blog | ब्लॉग

‘कलापूर’चा हा तरुण चित्रकार...!

सुजित पाटील

     इनाम म्हाळुंगे या छोट्या गावातील अन्‌ शेतकरी कुटुंबातील सागर कांबळे हा तरुण चित्रकार. लहानपणापासून चित्रकलेची आवड. दहावीपर्यंतचे शिक्षण झाले गावातच. बारावीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून घेतले खरे; पण कला अंगात मुरलेला सागर विज्ञानात काही रमेना. त्यामागे चित्रकला हे कारण आहेच; पण विज्ञानातील पुढचे शिक्षण घेण्यासारखी परिस्थितीही नव्हती. त्यात हा घरात मोठा. त्यामुळे घरची जबाबदारीही त्याच्यावरच. तरीही त्याने आई, वडील, भाऊ यांच्या पाठबळावर चित्रकलेतच करिअर करायचा निर्णय घेतला. आवडीच्या क्षेत्रात यशोशिखर गाठण्यासाठी कलानिकेतन महाविद्यालयातून एटीडीचे शिक्षण घेतल्यावर त्याने मुंबई गाठली. जे. जे. स्कूल ऑफ ऑर्टमधून बॅचलर ऑफ फाईन आर्ट आणि मास्टर ऑफ फाईन आर्टची पदवी घेतली.

ग्रामीण भागातील समस्या कलाविष्कारातून समाजासमोर मांडणे त्याला महत्त्वाचे वाटते आणि तोच त्याच्या चित्राचा विषय आहे. याचसंदर्भातील ‘ग्रामीण भागातील महिलांवरील बंधने’ या चित्राने त्याला ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. अकादमीचे ६१ वे राष्ट्रीय संमेलन दिल्लीत झाले. यासाठी देशभरातून पाच हजारांवर चित्रे आली होती. यातून प्रदर्शनासाठी २५० चित्रे निवडण्यात आली. उत्कृष्ट १५ चित्रांना पुरस्कार देण्यात आला. राज्यातून दोघांची निवड झाली. सोलापूरची तेजस्विनी सोनवणे आणि कोल्हापूरचा सागर. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याला नुकतेच गौरविण्यात आले. दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरूप असलेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर कोल्हापूरची मुद्रा उमटविणाऱ्या सागरला महाराष्ट्र राज्य शासनाच्या कला संचालनालयाचाही पुरस्कारही मिळाला आहे. प्रफुल्ला डहाणूकर आर्टस्‌ फाउंडेशन, दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या पुरस्कारसह अन्य मान्यवर संस्थांचे पुरस्कारही मिळाले आहेत.

दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे २८ वे अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीत नुकतेच झाले. यात सर्वोत्कृष्ट शिल्पकृतीसाठी व्यावसायिक कलाकार श्रेणी गटातील इंडिया आर्ट फेस्टिव्हल पुरस्कार जरगनगरच्या शुभम गंगाधर सुतार याने पटकावला. फायबर माध्यमातील ‘अभिजित’ ही कलाकृती त्याने साकारली होती.

डिसेंबरमध्ये राज्य शासनाच्या कला संचालनालयातर्फे झालेल्या ६० व्या कला प्रदर्शनातही रा. शि. गोसावी महाविद्यालयाची तेजस्विनी तानाजी पाटील, श्रुती एस. वाघ, दळवीज आर्टची प्रणोती संपत चौगले व सुनील चौधरी हे कोल्हापूरचे युवा चित्रकार पारितोषिकाचे मानकरी ठरले.
कोल्हापूरला वैभवशाली कलापरंपरा आहे. अनेक दिग्गजांच्या अमूल्य योगदानामुळेच कोल्हापूरला कलापूर म्हटले गेले. सध्याची पिढीही तो कोल्हापुरी वसा आपल्या कलेतून जोपासत ती ओळख आणखी ठळक करीत आहे. सागर, शुभम असोत वा तेजस्विनी, श्रुती, प्रणोती ही चित्रकलेत कोल्हापूरचा झेंडा फडकवणारी प्रातिनिधिक नावे. विविध कलांत अनेक युवक मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर यशाचे तोरण बांधत आहेत. कलापूरचा हा तरुण चेहरा कलेच्या प्रांतातील कोल्हापूरच्या दमदार यशाची नांदी आहे, हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT