Sant Gadge Baba is Karmayogi with a scientific outlook
Sant Gadge Baba is Karmayogi with a scientific outlook 
Blog | ब्लॉग

वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला कर्मयोगी...संत गाडगेबाबा!

प्रियांका देशमुख

गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारं महाराष्ट्रातील एकमेव नाव, बुरसटलेल्या विचारांना माती देणारं व्यक्तिमत्व, संत आणि समाजसुधारक, ज्यांनी स्वच्छतेचा मंत्र 60 ते 70 वर्षाच्या आधीच या जनसमुदायाला दिला. गरीब राहणी स्वीकारली, विविध गावांना भटकंती केली, विसाव्या शतकातील समाजसुधारकांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकीच एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा! अमरावती जिल्हातील व्हाराडातल्या शेंडगावी २३ फेब्रुवारी १८७६ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांची जन्मभूमी शेंडगाव असली तरी कर्मभूमी मात्र अख्ख्या भारतभर आहे. संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर; आणि आज याच महामानवाची पुण्यतिथी.

वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन जन्माला आलेले कर्मयोगी गाडगे महाराज, स्वत: उपाशी राहून, अंगावर चिंध्या पांघरून जगणारे वैराग्यमुर्ती गाडगेबाबा. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रूढी परंपरा, अंधश्रद्धा यावर टीका करून या समाजातील माणसांच्या डोक्यातील कचरा साफ करण्याचं काम या महामानवाने केलं. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत होते. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.

अध्यात्माचा विचार केला तर 33 कोटी देवांची निर्मिती करून ठेवलेली दिसून येते. पण इतके देव असतांनाही साधू संतांना जन्म घ्यावा लागला तो का? हा गहन प्रश्नच आहे. पण भगवंताने जन्माला घातलेल्या या मानवजातीचा विकास करण्यासाठीच ह्या संत महात्म्यांनी पृथ्वीतलावर जन्म घेतला. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या माणसाला मार्ग दाखविण्यासाठी ह्या कर्मयोगी पुरुषाला जन्मास घातले. कारण समाजात ज्या विचाराची, शिक्षणाची, माणुसकीची, प्रेमाची, मदतीची अशा कित्येक उणिवा आहेत त्या भरून काढण्यासाठी ह्या संत महात्म्यांनी जन्मास यावं आणि ह्या माणसाला जगण्याचं मर्म समजून सांगण्याकरिता चंदनासारखं झिजावं. हाच एक मनी ध्यास घेउन हे कर्मयोगी संत ही सृष्टी जन्मास घालत असावी.

कारण जो व्यक्ती शाळेत गेला नाही, जो व्यक्ती संगीत शिकला नाही ज्याला शास्त्र अध्यात्माची गरज नाही; तो व्यक्ती जेव्हा आपल्या साध्या सरळ वाणीतून अभंग गातो, किर्तन करून माणसात माणसाला देव शोधायला भाग पाडतो, गरीब, अनाथांना आपलं मानून त्यांची सेवा करतो तोच खरा संत होऊ शकतो, नाही तर अलीकडचे संत, बाबा, महाराज आपण बघूनच आहोत, नाही का?

जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।


ह्या परिवर्तनशील आणि आधुनिक समाजात संत का आवश्यक आहे? ते राष्ट्रसंत त्यांच्या संतचमत्कारामध्ये लिहितात की,

है संत दुनिया मे बढे।  तब ही तो है दुनिया खडी।
इनके प्रतापोसे ना अब नीचे ढली।

कीतना जगतमें पाप है, अंधकार से बाहर चला 
है संत ही की कृपा जो अबतक ना निचे ढला।


खरंतर त्यावेळी ह्या संतांनी लिहिलेल्या साहित्याची, विचारांची गरज आजच्या वर्तमान काळाला आहे.

कारण बदलो बदलना चाहिये। जैसी बखत आवेगीं।

या परिवर्तनशील समाजातील माणसाच्या विचारातील उणिवा भरून काढण्याचं कामच ह्या संत विचारांनी केलंय. म्हणून वैराग्य मूर्ती गाडगे महाराज कर्मयोगी झाले, स्वच्छतेचा संदेश संपूर्ण देशाला दिला जागोजागी धर्मशाळा वंचितांसाठी काढून स्वतः फाटके कपडे परिधान करून फिरत राहिले एवढंच नाही तर; स्वतःच्या मुलाच्या मृत्यू चा निरोप समजलेला असूनही ह्या समाजासाठी कीर्तन करीत असतांना बोलले की असे गेले कोट्यान कोटी काय रडू एकासाठी एवढा त्याग ह्या महापुरुषामध्ये होता. म्हणूनच ह्या जगात मी जगावेगळा संत पाहिला... या समाजातील उणिवा भरून काढण्यासाठीच हे संत जन्मास आले. जे उणं दिसलं ते पूर्ण करण्याचं काम या डेबूने केलं.

संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांमध्ये होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते, जनसंपर्क होता, सुशिक्षित समाजथरातील काही लोकं स्त्रिया आणि अतिशूद्र या सर्वांना तुच्छ समजला जात होता. स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र करून गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे गावून घेत होता. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहत होती. अशा महामानवाने २० डिसेंबर १९५६ रोजी अमरावती मधील ऋणमोचन येथील पेढी नदीवर आपला देह ठेवला, आणि या जगाचा निरोप घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Tampering Case: वायकरांच्या मेहुण्यापाठोपाठ ठाकरे गटाचे आमदार देखील अडचणीत, फेरमतमोजणी प्रकरणी नवा ट्विस्ट

Latest Marathi Live Updates : 10 पालखी प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपूरच्या पुजेचा मान मिळणार; 'शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेने'चा पुढाकार

T20 WC 2024 Super 8 Weather Forecast : वर्ल्ड कप जिंकण्याचे कर्णधार रोहितचे स्वप्न जाणार वाहून? 'सुपर-8'वर वरुणराजाची टांगती तलवार

New Zealand PMs: जपानला जाताना न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे विमान झालं खराब, मग असा पूर्ण केला प्रवास

Smartphone Tips : मोबाईल सर्व्हिस सेंटरला देताना करू नका 'या' चुका; होऊ शकतं मोठं नुकसान,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT