अंगावर येणारा अनुभव 
Blog | ब्लॉग

एक अंगावर येणारा अनुभव

डॉ. शंतून अभ्यंकर (वाई, जि. सातारा)

...ते अमिताभचं जाऊ दे, मी काय सांगत होतो... लोकरंगमंच...! नेमकं "लोकरंगमंच' याच नावाच्या सातारच्या संस्थेचं "बैल अ-बोलबाला' नावाचं नाटक नुकतंच पाहिलं मी. हे नाटक म्हणजे कोणतीही किस्सेवजा कहाणी नाही. विचारांना ढुश्‍या देणारे हे नाटक आहे. चक्क रवंथ करत बसावं असं आहे. बैलविषयक मराठीतील उत्तमोत्तम कविता इथे लयदार भाषेत गात, नाचत, वाजत-गाजत सादर होतात. एका शेतकऱ्याबरोबरच लहानाचा मोठा झालेला बैल, आता कसायाला विकायला काढलाय. त्या बैलाचा आणि मालकाचा हा आदल्या रात्रीतला संवाद. 

पार सिंधू संस्कृतीच्या शिक्‍क्‍यावरील बैलापासून सुरू झालेला माणसाचा आणि बैलांचा प्रवास. दोघेही एकमेकांवर अप्पलपोटेपणाचे आरोप करतात. स्वतःची बाजू हिरीरीने मांडतात, भांडतात, रडतात. शेतकऱ्याचं आणि बैलाचं सजीव, ओलं नातं पाहून/ऐकून आपलेही डोळे पाणावतात आणि अखेर बैलाची "कत्तल' ऐकून आपण हबकून जातो. 

आपल्या बापजाद्यांनी बैल पाळला तो गरज म्हणून. हा पशू माणसाळवल्यावर मग त्याच्याबद्दलच्या भावभावना, ऐश्वर्याच्या, पतप्रतिष्ठेच्या कल्पना, मूल्यव्यवस्था आल्या. नव्या जमान्यात या साऱ्या लयास जात आहेत. असल्या नाटकाची स्मरणरंजनपर विलापिका होण्यास असा कितीसा वेळ लागणार? पण, हा बैल तसा नाही. आपल्या प्राक्तनाला घट्टमुट्टपणे सामोरे जाणारा, पण त्याच वेळी आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा दस्तावेज, रोखठोकपणे मांडणारा हा बैल आहे. अर्थात प्रेक्षागृहात बैलाच्या सुख-दु:खाशी समरस होणारे, बाहेर येताच फुकट दिला तरी बैल पाळणार नाहीत, हे निश्‍चित... पण, लोकांनी बैल पाळावा असला वृषभ/गो-पूजक संदेश देणारं हे नाटक नव्हे. 

हे नाटक कधी आपल्यातला बैल तर कधी बैलातला माणूस, आपल्याला आलटून पालटून दाखवून देते. बैलही कधी मायाळू, कधी माजोर्डा, कधी मानी तर कधी मुका बिचारा असा मानवी असतो. आपणही कधी कधी बैलोबा असतो, कधी कधी शुद्ध नंदीबैल असतो, घाण्याचे बैल असतो, गावावरून ओवाळून टाकलेले वळू असतो. आपणही कोणाकडून तरी पाळले गेलेलो असतो आणि आपल्याही झुलीखाली चाबकाचे वळ असतात. 

भारदस्त कवींच्या कविता. त्यामुळे जबरदस्त शब्द, हेच या नाटकाचे सर्वांत मोठे बलस्थान. यातले कित्येक शब्द म्या पामराला अपरिचित. मी तरी बरा म्हणायचा. खेड्यात लहानाचा मोठा झालो आणि आज माझी प्रॅक्‍टिस खेड्यातच आहे. पण, पुणे-मुंबईच्या डॉटकॉम पिढीला हे फारच परकं वाटणार हे निश्‍चित. सॉरी हं... लिखाणात जरा खंड पडला. झालं असं की आत्ताच एक मुलगा आईला पायाला लागल्याचं सांगत आला आणि मी मधूनच उठून पेशंट तपासायला गेलो. काय झालं विचारल्यावर तो म्हणतो कसं, "आओ डाक्‍टर, आमी जत्रंला गेल्तो, पण अचानक "अ बुलक्‌ केम ऑन आवर बॉडी..' पाहिलंत, असा हा बैल, इट कम्स अचानक ऑन आवर बॉडी. अचानक तो जाणीव करून देतो, आपलं जिणं, आपलं राहाणं, आपलं खाणं, आपलं बोलणं सगळं सगळं बदलतंय. 

नीट बसत नाही म्हणून चार्जर काढून दुसऱ्या प्लगला लावावा तशा सहजतेने खेड्यापाड्यातल्या लोकांनी पोरांची नाळ इंग्रजीच्या प्लगला जोडली आहे. तेव्हा बैलाचा बुलक्‌ आणि शेणाचं बुलशिट झालेलंच आहे. बैल आता जाणारच आहे, नंतर झोपा करून उपयोग नाहीच्चे, तेव्हा तेवढे कष्ट तरी घ्यायचे का नाही, एवढंच आता ठरवायचं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT