Shiv jayanti special Creative bike on Shivaji Maharaj in kagal kolhapur marathi news 
Blog | ब्लॉग

Video : ShivJayanti 2020 : गाडीवरून गड घेऊन फिरणारा अनोखा शिवभक्त... 

अमरसिंह घोरपडे

कागल येथील पोलिस ठाण्यात एक दुचाकी उभी केली होती. ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. अनेक जण आपल्या मोबाईलमध्ये तिची छायाचित्रे टिपत होते. कर्नाटक पासिंगची ही मोटारसायकल निपाणी येथील एका शिवभक्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी सजवली आहे. या शिवभक्ताचे नाव आहे, सागर अशोक खांबे. दुचाकीसमोरील बाजूस शिवाजी महाराजांचा दरबार आहे. येथे राजे आणि काही मावळे आहेत.

त्यावरील बाजूला "राजगड राजधानी, रायगड राजधानी' असे लिहिले आहे. त्याविषयी ते सांगतात, ""छत्रपतींची पहिली राजधानी राजगड होती. त्यानंतर रायगड झाली. त्यामुळे ही नावे लिहिली आहेत.'' दुचाकीवर ठिकठिकाणी गड-किल्यांची सुमारे 90 नावे आहेत. काही ठिकाणी शिवरायांच्या मावळ्यांची नावे आहेत. भगवे ध्वज आहेत. वाघ, ढाल-तलवारी आहेत. छोट्या तोफा आहेत.

बाजीप्रभू देशपांडे यांचे चित्र असून, त्याखाली छत्रपतींच्या सुटकेखातर यमालाही पावनखिंडीत थांबविणारा वीर योद्धा म्हणजे बाजीप्रभू देशपांडे असे ठळक अक्षरात लिहिले आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्याविषयी ते म्हणतात, ""बाजीमधील बा म्हणजे ते बाप होते. जी म्हणजे जिगरबाज होते.'' माझ्या राजामुळे आज देव देवळात आहे, यांसारख्या ओळीही लिहिल्या आहेत. हॅंडलसमोर शिवा काशीद यांना मानाचा मुजरा असे लिहिले आहे. ते अगदी चालकाच्या नजरेसमोर येते.

याविषयी ते म्हणाले, "शिवा काशीद हे प्रति शिवाजीच होते.' त्याखाली शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, शिवाजीराजे, संभाजीराजे यांना मानाचा मुजरा अशी अक्षरे लिहिली आहेत. मागील बाजूस सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे नाव मोठ्या अक्षरात लिहिले आहे. त्याखाली "मुजरा आपल्या मावळ्यांना, जे स्वराज्यरक्षक होते', असे लिहून स्वराज्यासाठी लढलेल्या सर्व मावळ्यांना अभिवादन केले आहे. तानाजी मालुसरे यांना अभिवादन केले. आणखी नावे घालायची आहेत. जसे जमेल तसे हे करीत असल्याचे खांबे सांगतात. 

खांबे हे निपाणीतील एका भांडी कारखान्यात नोकरीस आहेत. सायंकाळी एका चायनीज सेंटरवर काम करतात. शिवरायांविषयी त्यांच्या मनात आदरभाव आहे. त्यामुळेच त्यांनी हा छंद जोपासला. भांडी कारखान्यातील नोकरीतून घर चालू शकते. सायंकाळी मित्रांत बसून गप्पाटप्पा करण्यापेक्षा चायनीज सेंटरवरील काम धरले. या पैशांमधून गाडीच्या सजावटीचा छंद जोपासत असल्याचे त्यांनी सांगितले. सुरवातीला घरच्यांचा विरोध होता. परंतु, मी माझा छंद चार-पाच वर्षांपासून जोपासत असल्याचे ते सांगतात. शिवजयंतीला गाडीची सजावट देखणी असते. गाडीला दोन छोटे स्पीकर जोडले असून, त्यावर शिवरायांची गाणी लावलेली असतात. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT