School
School 
Blog | ब्लॉग

...म्हणून शाळा सुरू होणे गरजेचे आहे !

सोनाली शितोळे- भोसले

कोरोनाच्या सावटाखाली मुलं गेली दोन वर्षे घरातच आहेत. ऑनलाईन शाळेमुळे त्यांची जिज्ञासा हरवू लागली आहे. शाळेतील संस्कार, मित्र-मैत्रिणींमुळे निर्माण होणारी समज, हपरत चालली आहे. त्यातूनच मुलांच्या स्वभावातही बदल होत आहे. त्यामुळे शाळा सुरू होणे गरजेचे आहे....

गेली दोन वर्ष सगळी मुलं आणि आपणही चार भिंतीमध्ये कोरोनाच्या सावटाखाली जगत आहोत, परंतु याचा परिणाम मुलांवर होत चालला आहे. जसे की मुलं शिक्षणापासून दूर होत चालली आहेत. त्यांना शिस्त राहिली नाही. शाळा सुरु असल्या की मुलं वेळेवर उठतात. आवरुन शाळेत जातात. शाळेतून आल्यावर तोंड-हात,पाय धुवून अभ्यासाला बसतात. त्यानंतर खेळतात. हा दिनक्रम कोरोनाच्या काळात विस्कळीत झाला. त्यामुळे मुलांच्या शरीरावर परिणाम होत चाललाय. त्यांचे वजन वाढू लागले आहे. दृष्टीवर परिणाम होणे , सतत फोन हाताळणे जे की मुलांसाठी घातक आहे आणि शिक्षणाचे जर पाहत असाल तर, ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणामध्ये खूप फरक आहे.

बाळ जन्माला आल्यावर रडणे जेवढे गरजेचे असते तसेच मुलांनी खेळणे, अभ्यास करणे हे देखील महत्वाचे असते. आपण दोन शिफ्ट मध्ये शाळा सुरु केली तर? सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी १२ ते सायंकाळी ५. प्रत्येक मुलाची ८ दिवसाने घरी रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट करायची, जर मुलांचे रिपोर्ट नॉर्मल असतील तर शाळेमध्ये पाठवायचे नसेल तर त्या मुलाला घरी ठेवायचे. आपण जर शाळा सुरु करायचा निर्णय नाही घेतला तर मुलं पुढील वर्गात तर जातात परंतु शिक्षणापासून वंचित राहतात. फिजिकली शाळेत जाणे व ऑनलाईन शाळेत जाणे यामध्ये खूप फरक आहे .

बरेच दिवस या गोष्टीचा विचार करत असता माझी बहिण इंग्लंडमध्ये राहते तिला मी विचारले तिकडे शिक्षण कसे सुरु आहे . त्यावर तिने सांगितले सरकारने मुलांना अॅटिजेन टेस्ट घरी करण्यासाठी किट मोफत दिले आहे. त्याचा उत्कृष्ठ उपयोग होतो. मला ऐकून छान वाटले म्हणून मी इकडे काही शिक्षक व डॉक्टर यांच्याशी बोलले. त्यावर डॉक्टरांचे म्हणणे आहे की, ''५ वी पासून मुलांचे शिक्षण सुरु करायला हरकत नाही. ती मुलं मास्क, सॅनिटायझरचा वापर करु शकतील व मुलांची डोळ्यांची तपासणी दर सहा महिन्याने केली पाहिजे. काही शिक्षकांचे मत असे आहे की, ''ऑनलाईन शिक्षण घेताना शिक्षकांना फार त्रास होतो. पालकांचा हस्तक्षेप जास्त होतो. १ तासाचा क्लास कधी २ तासांत होतो. काही शिक्षक तज्ञांचे मत आहे शाळा ही ऑफलाईन सुरु केली पाहिजे. जेणेकरुन मुलांना महत्वाचे विषय हे ऑनलाईनपेक्षा जास्त सखोल समजणे गरजेचे असतात.'' शिक्षकांचे मत आहे की, ''मुलांमध्ये जागरूकता निर्माण होईल जेणेकरुन ते बाहेर पण तसेच वावरतील , भितीमुळे मुलांना शिक्षणापासून दूर ठेवणे अयोग्य आहे. अर्थात स्कुल व ग्राऊंड मुलांसाठी खुप गरजेचे आहे, जसे की आपण मुलांना दिवसाआड म्हणजे १ दिवस ऑफलाईन स्कुल व १ दिवस ऑनलाईन स्कुल असं ही करु शकता.''

मुलांची आरोग्य तपासणी नियमितपणे करणे म्हणजे येत्या काळामध्ये ते आत्मविश्वासाने शाळेची पायरी चढू शकतील. शिक्षणतज्ज्ञ डॉ . अ. ल. देशमुख यांचे म्हणणे आहे, "प्रसारमाध्यमांनी तिसरी लाट येणार " चा खूप मोठा प्रसार केला आहे. त्यामुळे पालक कितपत तयार होतील हे आणखी सांगता येत नाही. परंतु आपल्याकडे ऑफलाईन शाळा ही सुरु झाली पाहिजे. जर झाली नाही तर हा दुष्परिणाम आत्ता नाही परंतु २ ते ३ वर्षाने पालकांना निश्चित दिसून येईल. कारण मुले फोन, लॅपटॉप या सारख्या गोष्टीच्या अधीन झाले आहेत. मुलांमध्ये चिडचिड वाढली आहे. हट्टी झाली आहेत, हेकेखोरपणा वाढला आहे. कारण रोज घरी असणे, तेच चेहरे, तेच रुटीन असते. मुलांना बदल हवा असतो. त्यांना खेळणे, मित्रांमध्ये बसणे, शाळेत गेल्यावर वेगवेगळ्या शिक्षकांना भेटणे अशा गोष्टी आवडत असतात. एकमेकांकडे बघून अभ्यास करणे, खेळणे ह्या गोष्टीपासून मुले खूप दूर झाली आहेत, म्हणून ऑफलाईन शाळा सुरु होणे खूप गरजेचे आहे.

काही प्राध्यापकांचे म्हणणे आहे की, ''शाळा ही ३ तासांची हवी व दिवसाआड हवी. म्हणजे मुलांना २५ या संख्येत बोलवता येईल. सोशल डिस्टन्स पण राहील. क्लासरुम रोजच्या रोज सॅनिटाईज करावी. अर्थात काम हे वाढणारे आहे. परंतु जो पर्यंत रुटीन लागत नाही तोपर्यंत हे नियम पाळून सुरु कराव्यात. मैदानावर देखील अंतर ठेवून व्यायाम करुन घ्यावेत. कारण मुलांमध्ये स्थुलपणा आलेला आहे . सुरुवातीचे सहा महिने दिवसाआड शाळा सुरु करावी व नंतर मुलांना पुर्वीसारखी सवय लागली की नेहमीप्रमाणे शाळा सुरू कराव्यात. यामध्ये पालकांना, शाळा व्यवस्थापनाला खूप अडचणी येणार, परंतु सर्वांनी मिळून सकारात्मक विचाराने पुढे येऊन या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. प्रत्येक पालकांनी नीट विचार करावा. ६० % मुलांच्या आई नोकरी करतात, त्यामुळे घरातदेखील मुलांकडे फार लक्ष देता येत नाही. या गोष्टीचा मुलांवर वेगळा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शाळा सुरु होणे खूप गरजेचे (आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT