special article of archana mule from sangli on your mind working as per the order and mood 
Blog | ब्लॉग

...तर आपलंही त्या घोड्यासारखंच..! 

अर्चना मुळे

सांगली : जनावरांच्या बाजारात एकटा आपल्या घोड्याचं भलतंच कौतुक करीत होता... तो खूप चांगला आहे. त्याच्या मनात आलं तर तो खूप कामं करतो. त्याच्या मनात आलं तर तो शर्यतीत पहिला येतोच. त्याच्या मनात आलं तर तो जास्तीचं ओझं उचलतो. हे सारं कौतुक ऐकल्यानंतर एका व्यापाऱ्याने पाच लाखांला घोडा खरेदी केला आणि ऐटीत घरी गेला. पुढे आठवडा उलटला तरी घोडा जागचा हललालच नाही. तरीही व्यापारी घोड्याची काळजी घेत होता मात्र आणखी आठ दिवसानंतरही घोडा जागचा हलेना तेंव्हा व्यापाऱ्याने मुळ मालकाला गाठले आणि फसवणुकीची तक्रार केली. संतापलेल्या व्यापाऱ्याला शांत करीत थंडपणे मालक म्हणाले, "घोडा देतानाच मी काय म्हणालो होतो ते आठवा. हा घोडा त्याच्या मनात आलं तर खूप कामं करतो.....मनात आलं तर....ओझं उचललो.. आता अद्याप त्याच्या मनातच आलं नाही तर त्याला मी काय करु?'' 

या घोड्यासारखंच आपलं असतं. सगळं काही मनात आलं तर.. मूड झाला तर... मला वाटलं तर... आपल्याला आवडलं तर....याउलट मनासारखं काही घडलं नाही तर वाईट वाटतं. लगेच मूड जातो. नाराज होतो. रागही येतो. तर काय आहे हे मन ? मन का ठरवणार मी कधी काम करायचं? मी कधी हसायचं? मी कधी कुठलं काम करायचं? पण हेच खरं आहे की आपली सगळी कामं मनावरच अवलंबून असतात. 

आपण बऱ्याचदा म्हणतो, "मनात आलं सहलीला जायचं आणि पटकन निघालो ते बरं झालं. नाहीतर माहित नाही कधी बाहेर पडलो असतो.'' मनात कधी पार्टीचं नियोजन असतं तर कधी घरगुती कामांचं, त्यानुसार कामं केली तर कामाला विलंब होत नाही. मुलांनाही बजावलं जातं, " जरा अभ्यासाचं मनावर घे किंवा यावर्षी लग्नाचं घे मनावर' म्हणजेच मनावर घेऊन केलेल्या कृतीला फलश्रूती आहे. अन्यथा मनातूनच कामाची... बोलण्याची इच्छा नसेल तर आपली अवस्था त्या घोड्यासारखीच असेल. निष्काम, निश्‍चल. 
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT