special story on suresh bhat Birth Anniversary 
Blog | ब्लॉग

तुझेच गीत गात आहे...

युवराज यादव

जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला
मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो...
असे म्हणत मराठी कलांगणात ‘गझल’ रुजवणाऱ्या सुरेश भट यांचा आज (ता. १५) जन्मदिन. मराठी भाषेला ‘गझल’ म्हणजे काय असते ते खऱ्या अर्थाने शिकवले भटसाहेबांनी. माधव ज्युलियनांनी मराठीत आणलेल्या गझलेची बाराखडी तयार केली. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांचे अर्धे आयुष्य गझलेसाठी व्यतीत केल्यावर ते तंत्र कवींना शिकवले. या बाराखडीमुळे गझलकारांच्या पिढ्या तयार झाल्या व होत आहेत. सुरवातीच्या काळात त्यांना प्रचंड टीकेचा आणि उपहासाचा सामना करावा लागला. मात्र...

जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही....
असे तत्कालीन टीकाकारांना ठणकावून सांगत भटसाहेबांनी जिद्दीने किल्ला लढवला. मराठीला शुद्ध आणि सशक्त गझल दिली. अनेकांना ‘गझल’ म्हणजे काय आणि कशी रचायची, याचे धडे त्यांनी दिलेले आहेत. भेटलेल्या नवकवींसमोर ते आपल्या ज्ञानाचा खजिना रिता करायचे. त्यांच्या अनेक प्रतिमा आज अनेक कवी विविधांगांनी वापरतानाही दिसतात. त्यांचा ‘एल्गार’ हा गझलसंग्रह वाचला तरी गझलेच्छूंचा गझलकार बनवायला पुरेसे आहे. भटसाहेबांचा शब्दसंचय व अचूक छटा असलेला शब्द वापरायचे प्रभुत्व अचंबित करणारे आहे.

बेरका होता दिलासा, मानभावी धीर होता
पाठ राखायास माझी लाघवी खंजीर होता
यातील दिलाशाला बेरका म्हणणे, खंजिराला लाघवी हे विशेषण देणे शिकण्यासारखेच आहे. खरे तर ते अत्यंत हळवे, मिश्‍कील, बेदरकार व संवेदनाक्षम व्यक्तिमत्त्व... मात्र साहित्यप्रांतात गझल व गझलकारांबाबत उपेक्षित वातावरण होते. त्यामुळे टीकाकारांना उत्तरे देताना त्यांचे आक्रमक रूपही गझलेमधूनच व्यक्‍त होताना दिसते -

स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने
थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता
यातून तरलता, नाट्यमयता, मृदुता आणि आक्रमकताही त्यांच्या गझलेत ओतप्रोत भरलेली जाणवते. त्यांच्या अनेक गझला व गीते महाराष्ट्राला पाठ आहेत. त्या सर्वोच्च पातळीवर गायल्याही गेल्या आहेत. त्यांचे गझल सादरीकरणही तितकेच श्रवणीय असे. आम्हा तिसऱ्या पिढीला मात्र त्यांचे किस्से ऐकून आणि गझला व्हिडिओमधून अनुभवाव्या लागत आहेत. अमरावतीच्या राजकमल चौकात पायडल रिक्षात बसून सर्वसामान्यांसमोर ते गझलेचा पसारा मांडत... हे ऐकून अंगावर काटेच उभे राहतात. पण तिथे पडलेल्या गझलेच्या कणिका अनेकांनी उचलल्या आणि त्यातून अनेक नवे गझलकार उभे राहिले. त्यातीलच एक म्हणजे गझलनवाज भीमराव पांचाळे. त्यांनी मराठी गझल रुजवण्याचा वसा घेतला आणि चाळीस वर्षे अव्याहतपणे त्यालाच वाहून घेतले आहे. पांचाळे यांच्यासारख्या अनेकांनी भटांकडून गझलेची प्रेरणा घेतली... आणि खरोखरच त्यांनी म्हटल्याप्रमाणे तिसऱ्या पिढीतही गझलेची आज संख्यात्मक आणि गुणात्मक रुजवण झाली आहे. आज मोठ्या प्रमाणात गझल मैफली, मुशायरे, गझलोत्सव रंगताहेत... ही मराठी गझलेचे खलिफा सुरेश भट यांची देन आहे. हा ‘कारवाँ’ असाच पुढे न्यायचा आहे, तेच त्यांना खरे अभिवादन ठरेल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

SCROLL FOR NEXT