special story on the topic to open a library in kolhapur by yuvaraj yadav 
Blog | ब्लॉग

दुरुस्त आये, पर... बहुत देरसे आये !

युवराज यादव

कोल्हापूर : हुश्‍श! अखेर ग्रंथालयांची दारे वाचकांसाठी उघडण्याचा आदेश सरकारकडून काढण्यात आला आणि पुस्तकांवर साचलेली धूळ सात महिन्यांनंतर झटकली गेली... आता पुन्हा ही ज्ञानभांडारे वाचनभूक शमवण्यासाठी सज्ज झाली आहेत. असे असले तरी वाचनालये खुली करण्याला इतका वेळ का लागला, वाचनालयात जाणे हे वाईन शॉप व बारमध्ये जाण्यापेक्षा अधिक कोरोनाप्रसारक ठरत असेल का... असे अनेक प्रश्‍न अनेकांना सतावत असतील.

वास्तविक पाहता, वाचनालयात जाणारी व्यक्‍ती बुद्धिजीवी असते हा सर्वसाधारण तर्क. त्यामुळे ती कोरोनाला रोखण्यासाठीची आवश्‍यक काळजी नक्‍कीच घेणार. याशिवाय प्रवेशावेळी सॅनिटायझिंग, आतमध्ये बसताना सामाजिक अंतर राखणे आदी गोष्टीही ग्रंथालयांनी आणि तेथे जाणाऱ्यांनी काटेकोरपणे पाळल्या असत्या. अगदी तरुणाई आणि लहान मुले आल्यास त्यांनाही या बाबतीत सांभाळणे काही कठीण नव्हते. पुस्तके घरी घेऊन जाणे, तेथेच बसून वाचणे... याबाबतही काही नियमावली तज्ज्ञांकडून बनवली असती तर वाचनवेड्यांनी पाळलीही असती. इतके असताना, वाचनालये सुरू करण्याचा नंबर मद्यालयांनंतर लागावा, याची खंत वाटणे साहजिक आहे.

याउलट बाजार उघडल्यानंतर तेथे उडालेली झुंबड, ‘मला काय हुतंय’ अशा आविर्भावात काही नागरिकांचा बेशिस्त वावर, नियमांची पायमल्ली आपण पाहिली. त्यात भर पडली ती मद्यालये उघडण्याची. अनेक जणांनी आपण देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतोय, असा आव आणत तेथे गर्दी केली आणि त्या योगे प्रत्यक्षात स्वत:ची क्षुधा शमवून घेतली. जिल्हाबंदी, राज्यबंदी उठवल्याने सगळीकडे संचार मुक्‍त झाला. त्यामुळे मुंबई-पुण्याहून अनेक जण गावाकडे आले. यातील काहींनी काळजी घेतली नव्हती आणि माहिती लपवण्याचेही प्रकार घडले. या साऱ्यामुळे कोरोनाचा झालेला उद्रेक साऱ्यांनी अनुभवला.

लॉक, अनलॉकच्या चांगल्या-वाईट परिणामांची कारणमीमांसा करण्याचा किंवा कुणावर दोषारोप करण्याचा इथे अजिबात हेतू नाही. फक्‍त वाईट याचे वाटते, की जिथे कोरोनासंदर्भातील नियम पाळणे सहज शक्‍य होते, त्या ग्रंथालयांचा विचार शेवटी व्हावा. याउलट पहिल्या लॉकडाउनच्या काळातही वाचनालयांना काही नियमावली घालून देऊन पुस्तकसेवा देण्याची मुभा दिली असती, तर अनेक वाचनवेड्यांचा बंद घरातील काळ सुखकारक आणि ज्ञानोपासक झाला असता.
असो. मद्यालयांनंतर का होईना, ग्रंथालये उघडण्याचा आदेश सरकारने दिला आहे... देरसे आये, पर दुरुस्त आये... असे म्हणून वाचनाला लागूयात..!

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT