story of patharvat stone artist he struggling for educate his children sakal
Blog | ब्लॉग

आता पोरांच्या हातात हातोडा बघितला की डोळ्यात पाणी येतं....

भर उन्हात दगडाला आकार देणारा 'पाथरवट' पाहतोय मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचं स्वप्न

निलेश बोरुडे

किरकटवाडी: "मी तिसरी शिकलोय. जगाया पुरतं लिहिता वाचता येतंय. 'ती' तर शाळंतच गेली नाय, पण आमचा संसार चांगला सुरू हाय. पिढ्यानपिढ्या चालत आल्याला आमचा हा दगडं घडवायचा धंदा करतोत. आता काळ बदललाय दादा. पहिल्यासाखी मागणी ऱ्हायली नाय. खेड्यातली लोकं गरज म्हणून आणि शहरातली लोकं हौस म्हणून आमी बनीवल्याल्या वस्तू घेत्यात. लय कष्ट हाय. आता लेकरांच्या हाती हातोडा बघीतला की डोळ्यात पाणी येतं बघा. आमी ठरवलंय, पोरांना असला धंदा करू द्यायचा नाय. ह्यो मोठा पाचवीत हाय अन् बारक्याला अजून शाळंत घालायचाय. लागण तेवढं कष्ट करणार पण पोरांना शिकवून मोठं करणार!"

जातं बनविण्यात मग्न असणारा संजय अगदी ओघवतं मणातलं बोलत होता. मुळचा औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नागापूर या गावचा रहिवासी असलेला बत्तीस वर्षीय संजय लक्ष्मण धोत्रे हा त्याची पत्नी सुमन व मुले सचिन (वय 10) आणि राजेश (वय 5) यांच्यासह सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत मुख्य रस्त्याला लागून पाटा-वरवंटा, जातं, ऊखळ, दगडी खलबत्ता, दगडी दिवा अशा वस्तू विकायला आलेला आहे. तेथेच रस्त्याच्या कडेला त्याने उघड्यावर महिनाभरासाठी आपला तात्पुरता संसार थाटला आहे. दिवसभर हातात छिन्नी आणि हातोडा घेऊन दोघे पती-पत्नी दगडी वस्तू बनवण्यात व्यस्त असतात.

आपल्या व्यवसायाबद्दल सांगताना संजय म्हणतो की, दोन तीन दिवस एक जातं किंवा पाटा-वरवंटा बनवायला लागतात. जातं हजार ते बाराशे रुपये, पाटा-वरवंटा सहाशे रुपये, ऊखळ सहाशे ते सातशे रुपये, खलबत्ता तीनशे रुपये आणि आकारानुसार शंभर ते दीडशे रुपयांना दिवा विकतो. वर्षाकाठी घरखर्च भागवून पन्नास-साठ हजार रुपये शिल्लक राहतात. हळूहळू या पारंपरिक वस्तूंची मागणी कमी होत चालली आहे, त्यामुळे आमच्या मुलांना हा व्यवसाय करुन देणार नाही. त्यासाठी त्यांना चांगलं शिकवणार आहे. आमच्या कित्येक पिढ्यांनी दगड घडवला आहे, पण आम्ही आता मुलांना घडवणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT