When Life Is Out Of Control ... 
Blog | ब्लॉग

जब लाईफ हो आऊट ऑफ कंट्रोल...

संजय पाठक

नंद आणि नील जीवलग मित्र. नंद थोडा गंभीर प्रवृत्तीचा तर नील खुशालचेंडू. ऑफिसातून बाहेर पडल्यावर ठरलेल्या ठिकाणी भेटून मस्तपैकी हवेत धुरांचे गोल सोडत मनसोक्त स्मोकिंग, नंतर काचेच्या ग्लासात वाफाळता चहा घेत दिवसभरातील गमतीजमती शेअर करायचे. हसायचे, हसवायचे. पण हल्ली नील थोडासा नाराज जाणवायचा. टेन्शनमध्ये, ट्रेसमध्ये जाणवायचा. म्हणून नंदने त्याला विचारले. 
हो...ना... करत नील बोलला. कंपनीत खूप वर्कलोड आहे. मार्चएंडपर्यंत अनेक टार्गेट कंप्लिट करायचेत, मॅन पॉवर कमीय, मॅनेजमेंट काही एकायला तयार नाहीए... कंटाळा आला रे सततच्या या वर्कलोडचा, बॉसिंगचा, इंटरनल डर्टी पॉलिटिक्‍सचा... साला, जाईल तिथं हे असलंच. मला तर हल्ली जीवच नकोसा झालाय. 
नीलसारखा खुशालचेंडू इतका वैतागलाय म्हणजे नक्कीच काही टेन्शनदायी घडत असणार हे जाणून नंद म्हणाला, नील तुला काय वाटतं मी शांत आहे म्हणजे मला काही ट्रेस नाही का..? मला काही वर्कलोड नाही का..? माझ्याबाबत इंटरनल डर्टी पॉलिटिक्‍स होत नसेल का..? अरे चलता है म्हणून सोडून द्यायला शिक. दोन डोकी एकत्र आली की सुरूच होतं हे डर्टी पॉलिटिक्‍स. ऑफिसमधील असल्या नकोशा फाइल्स डोक्‍यात सेव्हच होऊ द्यायच्या नाहीत. लगेचच डिलीट मारायच्या. 
हे पाहा, हातामध्ये पेन धरला. तर त्याचे फार काही वजन वाटत नाही. पण तोच पेन जर आपल्याला अर्धा दिवस, एक दिवस आहे त्याच पोझिशनमध्ये हातात धरायला सांगितला तर... तर काय होईल, अरे आपला हात दुखेल नं. तसंच आपल्या डोक्‍याचं, मन-मेंदूंचं असतं. ऑफिसमधील नको त्या घटना, प्रसंगाच्या फाइल्स लगेचच डिलीट करायला शिक. नाहीतर हा अनावश्‍यक डाटा व्हायरस बनून तुझं आख्ख आयुष्य खराब करून टाकेल. लाईफमधील समस्या, संकटांचा काही काळासाठी जरूर सिरिअसली कर. पण जर त्यांचा विचार तू सतत करत बसला तर मन, डोकं सुन्न होईल तुझं. उलट ट्रेस आणखी वाढेल. जितका जास्त विचार करू तितका ट्रेस हा वाढतच असतो. त्याला सोडून द्यायला शिक. नाहीतर फस्ट्रेशनमध्ये जाशील. 
बरोबरच आहे नं नंदचं, प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक ट्रेस असतात. आपण त्यांचा सतत विचार करतो, म्हणून ते काही कमी होतात का ओ. नाही नं, मग कशाला त्यांचा अति विचार करायचा. त्यांना आहे तिथं सोडायचं, डोक्‍यातील, मनातील, मेंदूतील अनावश्‍यक फाईल्स डिलीट करायला शिकायचं. शेवटी कसंय, लाइफ हो आऊट ऑफ कंट्रोल, तो शिटी बजा के बोल... ऑल इज वेल...! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT