ecm.jpg 
Citizen Journalism

क्षेत्रीय कार्यालयात ठराविक विभागांच्या स्थलांतर; नागरिकांची गैरसाेय साेय 

विठ्ठल तांबे

पुणे : वडगाव बुद्रुक भागातील सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे चार महिन्यांपूर्वी थाटात उद्‌घाटन झाले. परंतु, येथे टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील ठराविक विभाग स्थलांतरित करण्यात आले असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.  पालकमंत्री, स्थानिक आमदार, नगरसेवक व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे उद्‌घाटन थाटात झाले. प्रत्यक्षात मात्र या इमारतीत क्षेत्रीय कार्यालयाचा कारभार सुरू झालेला नाही.

अतिक्रमण विभाग, आरोग्य विभागातील काही भाग व स्थापत्य विभाग सिंहगड रस्ता येथील कार्यालयात स्थलांतरित झाले आहे. परंतु आस्थापना विभाग, आरोग्य विभाग व टेंडर विभागाचे कामकाज हे अजूनही टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयातूनच होत आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण होत आहे. सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एकही अधिकारी येथे बसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. येथे विविध सुविधांचा अभाव असल्याने अधिकारी टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात बसत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना आपल्या विविध तक्रारी व कामांसाठी सात ते आठ किलोमीटर लांब टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात जावे लागते. याचा प्रचंड मनस्ताप नागरिकांना होत आहे. एखाद्या कामाकरिता प्रत्यक्ष भेटण्यासाठी वडगाव, धायरी येथील नागरिकांना थेट टिळक रस्ता गाठावा लागतो. त्यामुळे नवीन इमारतीत त्वरित सर्व विभाग स्थलांतरित करण्यात यावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

''प्रभाग समितीची पहिली बैठक झाली. परंतु प्रत्यक्षात कामास सुरवात होण्यासाठी आणखी आठ दिवस लागतील. कारण, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात इंटरनेट आणि फोन सुविधा बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. तसेच टेंडर, इनवर्ड व आउटवर्ड कामासाठी टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात बसावे लागते.''
- संतोष तांदळे, सहायक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय 

"
सिंहगडरस्ता क्षेत्रीय कार्यालयात अधिकारी नसतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांना भेटण्यासाठी टिळक रस्ता क्षेत्रीय कायार्लयात जावे लागते."
- संदीप चव्हाण, नागरिक, धायरी गाव  

 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT