maath 
Citizen Journalism

पुण्यात माठांच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ 

सकाळवृत्तसेवा

पुणे :  दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून, सतत घशाला कोरड पडत असल्याने थंड पाणी घशाखाली गेल्याशिवाय बरे वाटत नाही. मध्यमवर्गीयांच्या घरात उन्हाळ्यात फ्रिजची खरेदी वाढते. पण, अजूनही एक मोठा वर्ग आहे. त्यांच्याकडे अद्यापही फ्रिज खरेदी करण्यास पुरेशी आर्थिक तरतूद नाही. तसेच, काही लोक घरात फ्रिज असला, तरी माठातील पाण्याला पसंती देतात. त्यामुळे उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी माठाला मागणी वाढत आहे. 

रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी माठविक्रीचे व्यवसाय करणारे अनेक विक्रेते दिसून येतात. याबाबत विक्रेत्यांशी चर्चा केली असता यावर्षी माठांची मागणी वाढली असल्याने खप चांगला आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. माठातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड होत असल्याने कोणताही खर्च येत नाही. माठाचा आकार व इतर सोयीनुसार माठाचे दर वेगवेगळे आहेत. 

''आमच्याकडे फ्रिज आहे. पण, माठातील थंड पाणी पिण्याची मजा काही औरच असते. प्रत्येक उन्हाळ्यात नवीन माठ घेतला जातो. घरातील सर्वजण शक्‍यतो माठातील थंड पाणीच पितात,'' असे सचिन झांबरे यांनी सांगितले; तर सतत भाड्याच्या खोलीत संसार थाटावा लागत असल्याने जागा व पैशाअभावी फ्रिज विकत घेता येत नाही. पण, उन्हाळा कडक असल्याने गार पाण्यासाठी प्रत्येक वर्षी माठ विकत घेऊन फ्रिजची उणीव भरून काढली जात असल्याचे एका भाडेकरूने नमूद केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराविरोधात बलूच मुलीची थेट भारताला साद; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Dapoli Tourism: सलग सुट्ट्यांचा फायदा; दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची तुफान गर्दी, हर्णै मासळी बाजारातही उत्साह

Khamgaon Krushi Bazar Samiti: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाखांचा हातभार

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT