

WPL 2027 Retaintion
Sakal
WPL 2027 Retention Full List of All Teams: वूमन्स प्रीमियर लीगचा पाचवा हंगाम पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच खेळला जाणार आहे. त्यामुळे त्यासाठी पाचही संघांची तयारी सुरू असून २८ ऑक्टोबरला कोचीमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
पण त्याआधी सर्व ५ संघांना संघाच कायम केलेल्या आणि संघातून करारमुक्त केलेल्या (Retention) खेळाडूंची यादीत जाहीर करण्याची २८ सप्टेंबर अंतिम तारीख होती. त्यानुसार सोमवारी (२८ सप्टेंबर) सर्व ५ संघांनी आपली रिटेन्शन लिस्ट जाहीर केली आहे.