Citizen Journalism

सोनवडे घाटाचे काम होणार केव्हा... 

प्रा. महेंद्र नाटेकर

कोल्हापूरला जाण्यासाठी आम्हा सिंधुदुर्गवासियांसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. एक म्हणजे फोडा घाट आणि करूळ घाट. पावसाळ्यात या दोन्ही घाटात दरडी कोसळतात त्यामुळे हे दोन्ही घाटमार्ग बंद होतात. करूळ घाट अवघड असल्याने अपघाताचेही प्रकार वारंवार घडत असतात. या दोन्ही मार्गावरील ताण कमी करायचा असेल तर घोटगे-सोनवडे या घाटमार्गास प्राधान्य देण्याची गरज आहे.

या मार्गाने इतर मार्गाच्या तुलनेत कोल्हापूरचे अंतर सुमारे वीस किलोमीटरने कमी होते. तसेच या मार्गाने फारशी उंचीही नाही. वळणेही कमी येतात. यासाठी घोटगे-सोनवडे घाटमार्ग सुचविण्यात आला होता. शासनाने या घाटमार्गाला 1970 च्या दशकात मंजुरी दिली आहे. वेंगुर्ला, मठ, पणदूर, घोटगे, सोनवडे व शिवडाव- कडगाव- गारगोटी अशा महामार्ग मंजूर केल्याचे जाहीर केले होते. 

सोनवडे घाटमार्ग होणार म्हणून सिंधुदुर्ग व कोल्हापूर वासियांना आनंदही झाला होता. परंतु पुढे हे काम रखडले. या मार्गासाठी अनेक आंदोलने झाली. रास्ता रोको, घेरावही घालण्यात आले. टप्प्याटप्प्याने या मार्गावर येणाऱ्या वनजमिनी व वनसंज्ञा जमिनीला पर्यायी जमिनीही देण्यात आल्या. स्थानिक ग्रामस्थांनी यास उत्स्फुर्त प्रतिसादही दिला.

घाटमार्गाच्या दोन्ही बाजूंनी दोन-दोन किलोमीटरचे रस्तेही तयार झाले. वन प्राणी सर्व्हेक्षण व जन सुनावणीही या मार्गासाठी झाले. कोणीही तक्रार न करता या घाटमार्गासाठी सर्वांनी सहकार्य केले. डेहराडूनने पर्यावरणासाठी हिरवा कंदीलही दिला. इतकेच काय घाटमार्गासाठी आवश्‍यक असलेला निधीही मंजूर करण्यात आला. घाटमार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत तर मग या मार्गाचे काम केव्हा पूर्ण होणार ? गेली चाळीस वर्षे घाटमार्गाची प्रतिक्षा करून आता जनता निराश झाली आहे. 
(लेखक सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT