Citizen Journalism

घरट्यासाठी झाड हवय... 

सुनेत्रा विजय जोशी

टकटक... 

पहाटेच जाग आली कुणीतरी टकटक करीत होते. 
दार उघडून बघितले बाहेर तर कुणीच उभे नव्हते.. 
आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीच्या गजावर दिसला एक पक्षी. 

चोचीने टकटक करीत तावदानावर उमटवीत होता नक्षी. 
का रे बाबा? विचारले तर म्हणाला भाड्याने मिळेल का एखादे झाड घरटे बांधण्यासाठी. 
एकटा कुठेही कसाही राहिलो असतो पण जागा हवी होणाऱ्या पिल्लांसाठी. 

तुमच्या भाऊबंदांनी लुटले आमचे रान केले निर्वासित. 
बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी असतो आता फिरस्तित. 
वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत थोडे दाणे अन पाणी. 
पण निवाऱ्याचे काय? हे लक्षात घेतच नाही कुणी. 
पोटाला हवेच खातो ती भिक अन नेतो थोडे घरी. 
खायला तर हवच जरी डोक्यावर छप्पर नसले तरी. 
कधीकधी वाटते आत्महत्या करावी बसुन विजेच्या तारेवर. 
किंवा द्यावा जीव लोटून उंच उंच त्या मोबाईल टाॅवरवर. 

जसे मग आत्महत्या नंतर सरकार काही देते शेतकऱ्यांला. 
तसेच मिळेल एखाद झाड माझ्या पिल्लांना तरी आसऱ्याला. 
ऐकून मी चक्रावले खरच एवढा विचार मी नव्हता केला. 
जंगलतोडीत त्यांच्या घरांचा विचार कुठेच नाही झाला. 
मी हात जोडून म्हटले त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. 
पण आत्महत्या करू नको खरच मनापासुन सांगते. 
तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर बांध वनरुम किचन खोपा. 
अडचण होईल पण आतातरी एवढाच उपाय आहे सोपा. 
तो म्हणाला खुप उपकार होतील पण भाडे कसे देणार. 
मी म्हटले रोज सकाळ संध्याकाळ मंजुळ गाणी ऐकव बाकी काही नाही मागणार. 
तो म्हणाला मला तुम्ही भेटलात पण बाकी नातलगांच काय
त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी कुठे ठेवतील पाय. 
अरे लावताहेत आता झाडे अन जगवतात

आता कुणी कुणी बदलतेय चित्र पण त्यांना सांग आत्महत्या करू नका कुणी
ऐकुन तो पक्षी उडाला काड्या जमवायला घरट्यासाठी. 
अन मी पण घरात आले तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी. 
त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाचे उघडले कवाड. 
वाचुन तुम्ही पण लावाल ना कुंडीत वा अंगणात एकतरी झाड.... निदान एक तरी झाड... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT