pud-rasta-revised.jpg 
Citizen Journalism

सुगम संगीतात रमले ज्येष्ठ

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'येणार साजन माझा' यासारखे गीत गाताना त्यातील लडीवाळपणा आवाजात जपत केलेला मुद्राभिनय आणि 'आली आली हो भागाबाई' सारखे भारूड सादर करताना ज्येष्ठांनी दाखविलेल्या उत्साहाला उपस्थितांनी जोरदार दाद दिली. निमित्त होते इंदिरा भक्ती सुगम संगीत मंडळाने आयोजित केलेल्या सुगम संगीत कार्यक्रमाचे.

'झाला' सोसायटीतील त्रिदल सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आयडियल कॉलनी, मयूर कॉलनी, बावधनमधील ज्येष्ठांनी सहभाग घेतला. सरोज नेर्लेकर या गेली बारा वर्षे ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी मोफत संगीत, गायन शिकवत आहेत. त्यांच्याकडून गायन शिकलेल्या ज्येष्ठांनी आपल्या गायनाचे सादरीकरण केले.  

'तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा' या गाण्यातील शब्दांचा आधार घेत ज्येष्ठ नागरिक कमलाकर नेर्लेकर म्हणाले की, आयुष्यात अनेक गोष्टी ठरविलेल्या असतात. परंतु, कामाच्या व्यापात त्यासाठी वेळ देता येत नाही. निवृत्ती पत्करल्यानंतर हाती असलेल्या वेळेचा फायदा घेत आपला छंद जोपासायचा. त्याचा आनंद स्वतः घ्यायचा आणि इतरांनाही द्यायचा, ही आमची भूमिका आहे. शब्दरूपी मोत्यांच्या माळांची ही गुंफण सुखावणारी आहे.

डॉ. सुनंदा येडके म्हणाल्या की, गायनाची इच्छा आहे. पण, गायनापर्यंत पोचता येत नव्हते, व्यासपीठ मिळत नव्हते अशा महिलांसाठी नेर्लेकर यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. गार्गी बेलसरे या विद्यार्थिनीने सादर केलेल्या तबलावादनाला सर्वांनी दाद दिली. या कार्यक्रमाचे संयोजन कुमार लिंगम, संजीव वाडीकर, सुजाता करमरकर आदींनी केले. अमोल जोशी, मिलिंद मराठे यांनी संवादिनी; तर रमेश भालवडकर यांनी तबल्यावर साथ दिली. सूत्रसंचालन रश्‍मी जयवंत, प्रकाश टोणगावकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

Patna Mother Murder : मुलानेच आईला जिवंत जाळलं; पोलिसांना म्हणाला- ‘मी देवाचा अवतार, कलियुग सुरूय, मीच तिला संपवलं'

Marathi News Live Updates : ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव; TMC नाव आणि पारंपरिक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

Badrinath Military Exhibition : बदरीनाथमध्ये मुख्यमंत्र्यांचा रायफल हातात घेत नेमबाजीचा सराव; लष्करी प्रदर्शनाची घेतली पाहणी

SCROLL FOR NEXT