Citizen Journalism

ब्लीस कोस्ट सोसायटीत रक्तदान व आरोग्य शिबिर

- चंद्रकांत गुरव

पुणे : आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी रस्त्यावरील लिपाणे वस्तीमधील ब्लीस कोस्ट ई विंग सोसायटीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सोसायटीच्या कार्यकारिणीच्या आणि रहिवाशांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. याचा फायदा 175 हून अधिक रहिवाशांनी घेतला. रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना सोसायटीच्या अध्यक्षा श्रीकला थोरात, उपाध्यक्ष हितेश पटेल आणि ऍक्‍टिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत लिपाणे यांच्या हस्ते प्रवासी बॅग भेट देण्यात आली. या वेळी 90 नागरिकांची आरोग्य तपासणी व 40 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. याप्रसंगी रेड प्लस ब्लड बॅंकेचे डॉ. पी. के. शिंदे, नेत्र चिकित्सक डॉ. रणवरे आणि हेल्थ वेअरनेसचे डॉ. अनिल वाठारकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वी केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी ब्लीस कोस्ट सोसायटीच्या अध्यक्षा थोरात, उपाध्यक्ष पटेल, सुनील कवडे, नंदू तुपे, अभिजित सुतार आणि विजय चव्हाण, तसेच ऍक्‍टिव्ह फाउंडेशनचे लिपाणे आणि इतर सोसायटी सदस्यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT