IMG-20190703-WA0016.jpg 
Citizen Journalism

#SaathChal : गायन, संगीत, नृत्याचा व्हिडिओ पाठवा अन्‌ लखपती व्हा ! 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जागतिकीकरणाच्या रेट्यात आपले कौटुंबिक नातेसंबंध टिकवून ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे. हा कौटुंबिक जिव्हाळा आणखी घट्ट करण्यासाठी 'सकाळ माध्यम समूह' आणि 'इंडियन रागा' या अग्रगण्य संस्था आपल्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून संधी घेऊन आल्या आहेत. निमित्त आहे आषाढी वारीचे. 

सातशेहून अधिक वर्षांची परंपरा असणाऱ्या पंढरीच्या वारीमध्ये विठुभक्त सहभागी होत आहेत. याच परंपरेचा सन्मान करण्यासाठी आपण आपल्या कुटुंबासह एकत्र यावे, अशी कल्पना आहे. आपल्या विश्‍वासार्हतेने महाराष्ट्राच्या मनात गेली 87 वर्षे आपले अढळस्थान निर्माण करणाऱ्या 'सकाळ'ने वारीच्या निमित्ताने गेल्या वर्षापासून 'साथ चल' उपक्रम सुरू केला अन्‌ त्यात आपल्या कुटुंबासमवेत वारीबरोबर काही अंतर चालण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदा या उपक्रमात अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

असा काढा व्हिडिओ 
'साथ चल' उपक्रमाला गीत, संगीत अन्‌ नृत्याची जोड दिली आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांसमवेत दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ बनवायचा आहे. यामध्ये कुटुंबीयांसमवेत पारंपरिक रचनेवर आधारित गायन, संगीत, नृत्य, भजन, अभंग अथवा संतरचना सादर करायच्या आहेत. हा व्हिडिओ 'सकाळ'कडे 10 जुलैपर्यंत शेअर करायचा आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क  :
अरुण सुर्वे : 9881193340 

येथे पाठवा व्हिडिओ :
मोबाईल क्रमांक : 9130088459 

भरघोस बक्षिसे 
प्रथम : एक लाख रुपये 
द्वितीय : 75 हजार रुपये 
तृतीय : 50 हजार रुपये 
उत्तेजनार्थ : 10 हजार रुपये. (दहा बक्षिसे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Lalit Modi and Vijay Mallya : Video-ललित मोदी अन् विजय मल्ल्याचा लंडनमधील पार्टीतील मजा-मस्ती व्हिडिओ तुम्ही पाहिली का?

Libra Soulmate Match: तुळ राशीची 'सोलमेट' कोण? जाणून घ्या राशीगणनेनुसार

SCROLL FOR NEXT