4ST_Bus_28.jpg 
Citizen Journalism

बोपगाव एसटीचे वेळापञक सुरळीत करा

दत्तात्रय फडतरे

पुणे : महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणुन पुणे जिल्ह्यातील बोपगांव येथील श्री क्षेञ कानिफनाथ गड प्रसिदध आहे. पुणे शहर व जिल्ह्या परिसरातील धार्मिक ठिकाण असल्यामुळे विविध तालुक्यातील भाविक- भक्त पोर्णिमा, गुरुवार, अमावस्या, शासकीय सुटटीच्या व इतर दिवशी दर्शनासाठी व पर्यटनासाठी गडावर येत असतात. परंतु , पुरंदर तालुक्यातील सासवड एटी आगारामधुन सोडण्यात येणारी एसटी बस सहा महिन्यापुर्वीपासुन वेळेवर उपलब्ध होत नाही, त्यामुळे भाविकांची गैरसोय होते.
वीस ते पंचवीस वर्षोपुर्वीपासुन सासवड एसटी आगारातुन सकाळी ११:१५ ला सुटणारी एसटी बस श्री क्षेञ कानिफनाथगड बोपगांव याठिकाणी दुपारी १२:०० वाजता असणाऱ्या नाथांच्या आरतीसाठी पोहचत असे. आरतीनंतर १२:३० ला सासवडला जाण्यासाठी निघत असे.

सहा महिन्यांपुर्वीपासुन सासवड एसटी प्रशासनाने वेळापञकात बदल केल्यामुळे १२ वाजता पोहचणारी एसटी बस कधीही वेळेवर पोहचत नाही व १२:३० च्या अगोदरच श्री क्षेञ कानिफनाथ गडावरुन निघते. जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरुन येणाऱ्या भाविकांची वेळेवर एसटी सेवा नसल्यामुळे मोठी गैरसोय होते.

सातत्याने होत असलेल्या गैरसौयीबद्दल एसटी प्रशासनाकडुन दुर्लक्ष होत आहे. एसटी पुणे विभाग नियंञक, सासवड एसटी आगार व्यवस्थापकांनी तातडीने दखल घ्यावी व वेळापञक पुर्ववत करावे, अशी मागणी भाविकांमधुन होत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Secret Meeting : शरद पवार गटाची गुप्त बैठक; पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये चर्चा, अजित पवार गटाचे काही आमदार संपर्कात?

Tech Tips : गाडी चालवताना येतो कटकट आवाज? लगेच चेक करून घ्या 'हा' पार्ट , नाहीतर होऊ शकतो मोठा अपघात

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गांवर विशेष मेगाब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांना फटका; पाहा लोकलचं वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : मुक्ताई माता मंदिरातील चोरी उघड; टोळीतील तिघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

लखनौकडून चेन्नईचा धुव्वा! ऋतुराज गायकवाडने पराभवानंतर मान्य केली मोठी चूक, म्हणाला आम्ही...

SCROLL FOR NEXT