signal 111.jpg 
Citizen Journalism

सिग्नलवरील फलकांमुळे बिबवेवाडीत वाहतूककाेंडी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्वामी विवेकानंद मार्गावर विविध विकासकामे सुरू असून, त्यासाठी ठिकठिकाणी कामांची माहिती देणारे फलक लावलेले आहेत; परंतु काही फलक चौकांमधील वाहतूक सिग्नलवर लावलेले असल्यामुळे वाहनचालकांना सिग्नलचा अंदाज येत नाही. यामुळे नागरिकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. तसेच, वाहतूककोंडीतही भर पडत आहे. 
अण्णा भाऊ साठे पुतळा चौकामध्ये विकासकामाचा फलक लावलेला असून, त्यामुळे बिबवेवाडी गावठाणाकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सिग्नलचा दिवा वाहनचालकांना दिसत नाही. वाहनचालक चौकात सर्वांत पुढे असणाऱ्या वाहनाच्या अंदाजावर वाहने चालवितात. अनेकवेळा चालक रस्त्यावरील वाहतुकीचे नियम डावलून पुढे जातात.
विवेकानंद मार्गाच्या विकासकामांचे फलक नागरिकांना, चालकांना व्यवस्थित दिसतील अशा ठिकाणी लावावेत, त्यामुळे नियम पाळणाऱ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या फलकांमुळे वाहतूक सिग्नल दिसत नसून, पुढे चालणाऱ्या वाहनाच्या अंदाजावर वाहन चालवावे लागत असल्याचे येथील रहिवासी वृषाली डोंगरे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात सलग सहाव्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात आजचा ताजा भाव किती? जाणून घ्या

IND vs AFG: भारतीय संघ निवडताना BCCI केलीय मोठी चूक; आयर्लंड, इंग्लंडपाठोपाठ अफगाणिस्तानही अय्यरच्या संघाला लोळवणार

Mumbai News: VIPसाठी सामान्य नागरिकाला ढकललं, पोलिसांनी सायकल दिली फेकून; Video Viral

Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 : नोकरीची सुवर्णसंधी! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत 67 लिपिक पदांची भरती; TCS मार्फत होणार परीक्षा, 'हे' प्रमाणपत्र असणे बंधनकारक

Marathi News Live Updates : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मोठी घडामोड; CBI चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT