vastu shastra for polpat latkan Sakal
कुकिंग

Vastu Shastra : पोळपाट- लाटणं घरात कुठे ठेवायचं, त्याचेही आहेत नियम; जाणून घ्या...

या गोष्टी चुकीच्या पद्धतीने ठेवल्याने तुम्हाला आर्थिक नुकसानही सोसावं लागू शकतं.

वैष्णवी कारंजकर

Vastu Shastra: घर कसं असावं, कुठली गोष्ट कुठे ठेवावी, याचे काही नियम आहेत. या नियमांविषयी तुमच्यापैकी अनेक जणांना माहिती असेलच.

रोज चपात्या करण्यासाठी वापरलं जाणारं पोळपाट लाटणं कुठे ठेवायचं याचेही नियम वास्तूशास्त्रात सांगितलेले आहेत. या गोष्टी चुकीच्या पद्धतीने ठेवल्याने तुम्हाला आर्थिक नुकसानही सोसावं लागू शकतं.

पोळपाट- लाटणे कधी विकत घ्यावे?

वास्तुशास्त्राने हा दिवसही ठरवून दिला आहे. बुधवारी पोळपाट लाटणं खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी खरेदी केल्यास आर्थिक लाभ होतो. तर मंगळवार व शनिवारी पोळपाट लाटणे खरेदी केल्यास जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.

कोणत्या प्रकारचे पोळपाट लाटणे घ्यावे?

वास्तुशास्त्रानुसार, स्टीलचे पोळपाट लाटणे वापरणं चांगलं आहे. लाकडाच्या पोळपाट लाटण्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पोळपाट सपाट जमिनीवर ठेवून बघावे.

ते हलणार नाही, हे पाहून खरेदी करावे. लाटण्याचे विविध प्रकार असतात - ज्यामध्ये पापडासाठीच्या लाटण्याचाही समावेश असतो. त्यामुळे लाटणे आपल्या गरजेनुसार निवडावे.

हे करू नये!

- पोळपाट लाटणे उलटे ठेवू नये.

- धान्याच्या डब्ब्यावर ठेवू नये.

- पोळपाट लाटण्यावर काम करताना आवाज होऊ नये.

- तुटलेलं पोळपाट लाटणं वापरू नये.

- वापरल्यानंतर पोळपाट लाटणं अस्वच्छ ठेवू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT