वृद्धेला गंडा घालून साडेपाच तोळ्याच्या बांगड्या लंपास esakal
Crime | गुन्हा

Crime News : वृद्धेला गंडा घालून साडेपाच तोळ्याच्या बांगड्या लंपास

दोघांनी केली बातवणी ; धामणी रस्त्यावर घडली घटना

सकाळ डिजिटल टीम

सांगली ः हॉर्ट ऑफ सिटीतील धामणी रस्त्यावर मॉर्निंग वाकर्सची संख्या अधिक असते. आज सकाळी आठची वेळ होती... दोघे युवक दुचाकीवरून आले. एका हॉटेलजवळील गल्लीत त्यांनी एका वृद्धेला गाठले. त्यांच्याकडून गोड बोलून दागिने (सोन्याच्या बांगड्या) काढून घेतले. त्याचवेळी ते दागिने घरी सुरक्षित पोहचवतो, असे सांगून चोरट्यांनी धूम ठोकली. सकाळी आठच्या सुमारास भरवस्तीत चोरट्यांनी साडेपाच तोळ्याच्या बांगड्या घेवून धूम ठोकली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघा अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला. याप्रकरणी राजश्री रामचंद्र गायकवाड (वय ६५) यांनी फिर्याद दिली.

पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, श्रीमती गायकवाड या धामणी रस्त्यावरील परख हॉटेलसमोरील बाजूस कुटुंबासह राहण्यास आहेत. आज सकाळी त्या फिरायला घराबाहेर पाडल्या. आठच्या सुमारास मुख्य रस्त्यावरून त्या घराकडे चालल्या होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून तोंडाला बांधलेले दोन युवक त्यांच्यासमोर आले. त्यांनी गायकवाड यांनी बोलण्यात गुंतवले. त्याचवेळी एका संशयिताने तुमचे दागिने काढून माझ्या हातात द्या, ते सुरक्षित घरी पोहचवतो, असे सांगितले. गायकवाड यांनी त्यांच्या हातातातील साडेपाच तोळ्याच्या दोन बांगड्या काढून त्यांच्या हातात ठेवल्या. बांगड्या मिळताच क्षणात चोरट्यांनी धूम ठोकली. अचानक झालेल्या घटनेमुळे गायकवाड घाबरल्या. त्यांनी आरडाओरडा केला, परंतू चोरटे पसार झाले.

दरम्यान, घटनेनंतर विश्रामबागचे निरीक्षक ईश्‍वर ओमासे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.त्यावेळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. सराईत चोरट्याने ही चोरी केली असवा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ तपासासाठी पथके रवाना केली. घटनेमुळे परिसरात धबराहट पसरली आहे.

अंगठ्या वाचल्या...

दोघ्यांनी वृद्धेला बातावणी केली गंडा घातला खरा मात्र, त्यावेळी बांगड्यांसोबत अंगठ्याही काढून दिल्या होत्या. त्यावेळी त्यातील एका संशयिताने त्या अंगठ्या पुन्हा परत दिल्या. सुदैवाने त्या अंगठ्या वाचल्या, अशी चर्चा परिसरात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT