Crime sakal
Crime | गुन्हा

मसाला विक्रेता झाला अस्थिरोगतज्ञ, वसईतील बोगस शस्त्रक्रियांमुळे ८ जणांना अपंगत्व

ओमकार वाबळे

डॉक्टरकडून झालेली चूक किती महागात पडू शकते याचा प्रत्यय वसईतील एका घटनेवरून आला आहे. या प्रकरणातील आरोपी व्यक्ती डॉक्टरही नव्हती. मात्र डॉक्टर असल्याचं भासवून काही रुग्णांचे उपचार केले. आणि त्यामुळे आठ जणांना आयुष्यभराचं अपंगत्व आलंय. (Vasai Crime news)

हेमंत पाटील नावाच्या बोगस डॉक्टरने रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. यानंतर हे रुग्ण कायमचे अपंग झाले आहेत. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुडघ्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना कमी पैशात शस्त्रक्रिया करण्याचा मोह आवरता आला नाही.

आणि त्यांना कायमचं अपंगत्व आलं आहे. या डॉक्टरने १० लाखांचा खर्च असताना दोन लाखात इलाज करून देत असल्याचं सांगितलं. खोटी हमी दिल्यानंतर रुग्णांची फसवणूक झाल्याचं समोर आलं. यामध्ये एका महिलेचे दोन्ही गुडघे निकामी झाले आहेत.

संबंधित बोगस डॉक्टर सध्या गजाआड आहे. या व्यक्तीचा मसाल्याचा धंदा होता. मात्र सामान्य नागरिकांना गंडा घालून त्याने पैसे लाटल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT