Molestation esakal
Crime | गुन्हा

Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षे सक्तमजुरी

प्रकरणात १७ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : कंपनीतून मावस बहिणीसोबत घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी उमेश साहेबराव कापसे (वय २५, रा. महालपिंप्री ता.जि. छत्रपती संभाजीनगर) याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली दोन हजार रुपयांच्या दंडांची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावली.

या प्रकरणात १७ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. त्यानुसार, पीडिता व तिची मावस बहीण एका कंपनीत कामाला होती. २२ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी त्या दोघी कंपनीतून घराकडे पायी निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवर आरोपी उमेश कापसे हा तेथे आला. त्याने दुचाकी फिर्यादीजवळ थांबवत, तुमच्या घरी काहीतरी मॅटर झाले आहे,

तुम्ही लवकर दुचाकीवर बसा असे सांगितल्याने दोघी आरोपीच्या दुचाकीवर बसल्या. पुढे एका चौफुलीवर दुचाकी थांबवत तू मला खूप आवडते असे म्हणत फिर्यादीचा हात धरला व तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तत्कालीन उपनिरीक्षक ए. सी. कुंभार यांनी दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सहायक सरकारी लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी

चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्‍यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवि कलम ३५४ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी, ५०० रुपये दंड, कलम ३५४ (अ) अन्वये एक वर्ष सक्तमजुरी, ५०० रुपये दंड आणि पोक्सोच्या कलम ८ अन्वये ३ वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस शिपाई शीला घुगे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Asia Cup साठी श्रेयस अय्यरला डावलल्यानंतर अजित आगरकरसोबतचे जुने मतभेद पुन्हा चर्चेत; वाचा सविस्तर

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT