Murder Sakal
Crime | गुन्हा

Crime: पत्नीच्या 19 वर्षीय प्रियकराचा खून करुन मृतदेह झाडाला लटकवला

Bhivandi : 40 वर्षीय गुंडाचं कृत्य

सकाळ डिजिटल टीम

Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह झाडावर लटकल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर माहेरी गेलेल्या पत्नीला मारण्यासाठी निघालेल्या आरोपीस भिवंडीतील गुन्हे शाखा घटक-२ च्या पोलिसांनी जेरबंद केले.

सद्दाम इसहाक हुसेन (वय १९) असे मृत तरुणाचे नाव असून सुरेंद्र कन्हय्यालाल सोनकर (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. सद्दाम हा सुरेंद्रच्या टेम्पोवर चालक म्हणून काम करीत होता. सुरेंद्रच्या तिसऱ्या पत्नीबरोबर सद्दाम नेहमी फोनवर बोलत असल्याने आणि तिला उत्तर प्रदेशमध्ये माहेरी पळून जाण्यास मदत केल्याचा संशय सुरेंद्रला होता. त्यामुळे त्याने सद्दामचा खून करून त्याचा मृतदेह झाडाला लटकविला होता. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणी पोलिस तपास करताना ही बाब समोर आल्याने पोलिसांनी सुरेंद्रचा शोध घेतला असता तो आपल्या पत्नीला मारण्यासाठी तिच्या माहेरी रेल्वेमधून जात असल्याचे समजले. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या स्थानिक पोलिस ठाण्याच्या सहकार्याने आरोपी सुरेंद्र सोनकरला दुसरा गुन्हा करण्यापूर्वी ताब्यात घेतले.

आरोपी सराईत गुन्हेगार

आरोपी सुरेंद्रला अटक करण्यासाठी भिवंडीतील गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक तत्काळ उत्तर प्रदेश येथे रवाना झाले. ताब्यात घेतलेल्या आरोपीला नारपोली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपी सुरेंद्र सोनकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर भिवंडी, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणी गुन्हे नोंद आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड व सहायक पोलिस निरीक्षक धनराज केदार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT