crime Sakal
Crime | गुन्हा

जमीन नावावर करून अडीच कोटींची फसवणूक

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन परस्पर नावावर करून घेत तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन परस्पर नावावर करून घेत तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली असून न्यायालयाने त्याला २५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

उत्तुंग कृष्णराव पाटील (वय २८, रा. रहाटणी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रीतम सुरेंद्र पाषाणकर (वय ४४) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मे ते जून २०२१ दरम्यान हिंजवडी फेज एक परिसरात हा प्रकार घडला. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या वडीलांच्या नावावर मुळशी तालुक्यातील गोडांबेवाडी येथे असलेल्या जमिनीचे परस्पर बनावट व्यक्ती उभ्या करून, बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून तसेच खोट्या सह्या करून साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र तयार करून घेतले. तसेच खरेदीखत तयार करून परस्पर ही जमीन उत्तुंग पाटील याच्या नावावर करून घेतली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पाटील याला अटक करून मंगळवारी (ता. १७) न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. बनावट व्यक्ती कोण होत्या?, बनावट कागदपत्रे कोठे तयार करून घेतली?, त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT