कोंबडीचोर आरोपींना कामशेत पोलिसांनी अटक केली SAKAL
Crime | गुन्हा

पुण्यात कोंबडीचोरांचा सुळसुळाट; ९ जणांना अटक

सकाळ ऑनलाईन


कामशेत येथे एका कुक्कुटपालन व्यावसायिकाच्या कोंबड्या पळवून नेल्याप्रकरणी कामशेत पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी ही घटना घडली होती. तसेच गेल्या महिन्यातीलही असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे.

३० मार्चला कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोवर ४-५ जणांनी हल्ला केला. यावेळी त्यांनी १ हजार ४४२ कोंबड्या चोरल्या. तसेच टेम्पो चालकाचा भ्रमणध्वनीही चोरला. त्यांनी पळवलेल्या मालाची किंमत तब्बल १२ लाख रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या साहाय्याने आणि सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे ५ जणांना अटक केली आहे. रॉकी शेख, सुखुद्दिन शेख, देविदास काकडे, वैभव कांबळे, वैभव होगाडे अशी आरोपींची नावे आहेत. कामशेत पोलीस पुढील तपास करत आहेत.

अशीच घटना गेल्या महिन्यात शिरूरमध्येही झाल्याचे उघड झाले आहे. शिरूर तालुक्यातील मौजे न्हावरे या ठिकाणी ५ तरुणांनी पंडित सवारे या व्यावसायिकाचा टेम्पो लुटून १ हजार ३६० कोंबड्या चोरल्या होत्या. या प्रकरणी भानुदास बोड्रे, यशवंत वेताळ, सागर टेमगिरे, केतन नरवडे यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT