लवजिहाद
लवजिहाद sakal
Crime | गुन्हा

Nashik Crime : नाशिक मध्ये लवजिहादच्या प्रकरणातून झाले अल्पवयीन मुलीचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : नाशिक जिल्हातुन लव जिहादचे एक खळबजनक प्रकरण समोर आले आहे. निफाड तालुक्यात राहणाऱ्या निकिता नावाच्या 18 वर्षीय हिंदू तरुणीवर तिच्या परिसरात किराणा दुकान चालवणारा रईस सय्यद नावाच्या विवाहित तरुणाला ती खूप आवडत होती.

त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. सय्यद एका मुलाचा बाप असूनही तिला सतत त्रास देत असे, धमकावत असे की जर तिने त्याच्याशी लग्न केले नाही, तर तो तिचे आयुष्य उद्ध्वस्त करेल, इतकेच नाही तर तो तिच्या आईला फोन व मॅसेज करून अशा अनेक धमक्या देत होता.

27 मे रोजी पीडित निकिता कॉम्प्युटर क्लासला जात असताना आरोपींनी बळजबरीने तिचे अपहरण केले. आरोपींनी निकिताचे अपहरण करून थेट अजमेरला नेले, तेथे दर्शन घेतल्यानंतर तिला तारागड दर्ग्यातही नेले.

त्यानंतर आरोपीने पुन्हा मुंबईसाठी दादरला जाणारी ट्रेन पकडली आणि मुंबईला पोहोचल्यानंतर तो अंबरनाथ, ठाणे येथे बहिणीच्या घरी गेला. जिथे अंबरनाथ पोलिसांनी रईस सय्यदला ताब्यात घेतले. त्यानंतर नाशिकचे निफाड पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे

पोलिसांनी निकिताला ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आणि गुरुवारी निफाड पोलिसांनी आरोपी रईसविरुद्ध एफआयआर नोंदवला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 363, 366, 354(डी), 506 आयपीसी, कलम 3(2)(व्ही), 3(2)(वा), कलम 12 आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT