Crime-Story sakal
Crime | गुन्हा

पुणे : दहशत पसरविणाऱ्या गुंडाविरुद्ध कारवाई

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हा आदेश दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उत्तमनगर (uutamnagar)परिसरामध्ये विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करून नागरिक, विक्रेते व व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार (MPDA) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (amitabh gupta) यांनी या कारवाईचा आदेश दिला. (Location action against criminal spreading terror in Uttamnagar)

दिनेश किसन वांजळे (वय 21, रा. मराठी शाळेशेजारी, न्यु कोपरे, हवेली) असे कारवाई झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश वांजळे हा उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. वांजळे व त्याच्या साथीदाराविरुद्ध वारजे माळवाडी व उत्तम नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोयता, सुरा यांसारखी हत्यारे जवळ बाळगून खुनाचा प्रयत्न,जबरी दुखाबत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील सहा वर्षात वांजळेविरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत.

त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे संबंधित परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडत होती. त्याच्यापासून जीवीतास व मालमत्तेचे नुकसान होईल, या भितीपोटी नागरिक त्याच्याविरुद्ध उघडपणे तक्रार देण्यात तयार होत नव्हते. उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी संबंधीत गुन्हेगाराविरुद्ध "एमपीडीए' अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पाठविला होता. त्यानुसार, पोलिस आयुक्त गुप्ता यांनी एक वर्षासाठी आरोपीवर स्थानबद्धतेची कारवाई करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. दरम्यान, मागील दहा महिन्यात 31 गुन्हेगारांवर "एमपीडीए' अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: टॉयलेटमधील पाणी आणलं अन् शिकंजी बनवण्यासाठी मिसळलं; रेल्वे स्थानक परिसरातला धक्कादायक व्हिडीओ

Igatpuri Crime : पर्यटकांवरील हल्ल्याचे सूत्रधार जेरबंद; मुंढेगावातून अटक, इगतपुरीत धिंड काढून पोलिसांचा गुंडांना इशारा

Latest Marathi News Live Update : आयपीएस अनुराग कुमार यांनी आज दिल्ली पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! पुन्हा पाणीटंचाईचं संकट; २० टक्के पाणीकपात कायम, कारण काय?

"तुम्हाला हे करायचंच होतं, मग वाट कसली पाहत होता?" R Ashwin संतापला, रोहितला दिलेल्या वागणुकीवरून टोचले कान; उद्या विराटसोबत...

SCROLL FOR NEXT