crime 
Crime | गुन्हा

धुळ्यात गांजासह नशेच्या गोळ्या जप्त

छाप्यात नऊशे रुपये किमतीचा गांजा तसेच ८९ हजार ५०४ किमतीच्या नशेच्या ३६ हजार ८१६ औषधी गोळ्या जप्त केल्या.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील मौलवीगंज भागात चांदतारा चौकामधील पप्पू चोर आणि मुन्नाच्या घरासह दुकानावर आझादनगर पोलिसांनी (Police Red) छापा टाकला. त्यात ९० हजार किमतीचा गांजा आणि नशेच्या गोळ्या (drug pills) जप्त केल्या. या संशयितांना पोलिसांनी अटक केली.


तरुणांना नशेसाठी कोरेक्स औषध किंवा कुत्ता गोळ्यांच्या विक्रीबाबतची माहिती नागरिकांनी द्यावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केले. आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चांदतारा चौकातील पप्पू शाबान अन्सारी ऊर्फ पप्पू चोर त्याच्या घरात आणि किराणा दुकानातून गुंगीवर्धक नशेच्या गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली. त्यांनी पोलिस अधीक्षक प्रवीण पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकर यांच्या मदतीने पप्पू आणि मुन्ना अन्सारीच्या घरासह किराणा दुकानावर पोलिसांनी छापा टाकला.

या छाप्यात नऊशे रुपये किमतीचा गांजा तसेच ८९ हजार ५०४ किमतीच्या नशेच्या ३६ हजार ८१६ औषधी गोळ्या जप्त केल्या. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पावरा, पोलिस कर्मचारी खलिदा सय्यद, सुनील पाथरवट, विजय शिरसाठ, अतिक शेख, शोएब बेग, सचिन वाडिले, जितेंद्र परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. श्री. पावरा यांच्या फिर्यादीनुसार अटकेतील दोघांवर गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT