crime esakal
Crime | गुन्हा

Mumbai Crime : पतीने घेतले उसणे पैसे म्हणून रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात घातला हातोडा

Mumbai Crime : महिलेने पती घरी नाहीत, ते आले की पैसे देऊ असे राजीव याला सांगितले

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime : पतीने उसणे पैसे घेतले होते. ते पैसे मागण्यासाठी एक व्यक्ती घरी आला. मात्र पती घरी नसल्याचे घरातील महिलेने सांगताच संतापलेल्या व्यक्तीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घातला.

ऐवढेच नाही तर इंजेक्शन सारखी टोकदार वस्तू तिच्या मानेला टोचून तिला गंभीर जखमी केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात ममताराणी पात्रा (वय 36) हिने राजीव भुयान याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरात ममताराणी या परिवारासह राहतात. मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास राजीव हा ममताराणी यांच्या घरी आला. त्याने ममताराणी यांच्याकडे पतीने घेतलेले उसणे पैसे मला परत करा अशी मागणी केली.

महिलेने पती घरी नाहीत, ते आले की पैसे देऊ असे राजीव याला सांगितले. याचा राग आल्याने राजीव याने संतापाच्या भरात ममताराणी यांना हाताच्या चापटीने मारहाण केली. त्यानंतर राजीवने त्याच्या पिशवीतील हातोडा काढून तो ममताराणी यांच्या डोक्यात मारला. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या.

एवढेच नाही तर नंतर राजीवने इंजेक्शनसारखी टोकदार वस्तू काढून ममताराणी यांच्या मानेला टोचली व नंतर तेथून पळ काढला. गंभीर जखमी ममताराणी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन टिळकनगर पोलिस ठाण्यात राजीव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस राजीवचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT