crime sakal
Crime | गुन्हा

यवत पोलिसांच्या तावडीतुन आरोपीचे पलायन

वरवंड हद्दीतील एका हाॅटेलमध्ये चहा पिण्यासाठी पोलिस आरोपीला घेवुन थांबले असताना हा प्रकार घडला.

अमर परदेशी, वरवंड

वरवंड : एका फसवणुकीच्या गुन्हयात ताब्यात घेतलेला आरोपी यवत (ता.दौंड) पोलिसांच्या तावडीतुन पळुन गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला.दौंड कोर्टातुन यवत पोलिस ठाण्यात घेवुन जात असताना वरवंड हद्दीतील एका हाॅटेलमध्ये चहा पिण्यासाठी पोलिस आरोपीला घेवुन थांबले असताना हा प्रकार घडला. आबासाहेब सुखदेव बाबुल रा.जळगाव ्से आरोपीचे नाव आहे.सायंकाळी उशीरा पर्यंत पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने उसाच्या शेतात आरोपीची शोध मोहीत सुरु होती.

यवत पोलिसांनी एका फसवणुक प्रकरणी संबधीत आरोपीला जळगाव मधुन मोठया शिताफिने अटक केली होती.त्यानंतर आज दुपारी दौंड न्यायालयात पोलिस बंदोबस्तात आरोपीला हजर करण्यात आले.त्यानंतर आरोपीला काही पोलिस कर्मचारी यवत पोलिस ठाण्याकडे घेवुन जात होते.मात्र,संबधीत पोलिस आरोपीसह चहा किंबहुना पाणी पिण्यासाठी वरवंड हद्दीतील एका हाॅटले मध्ये थांबले. त्यावेळी आरोपीने पोलिसांचा गाफिल पणा ओळखुन क्षणात पलायन केले. पोलिस पाठलाग करेपर्यंत आरोपी हाॅटेलच्या पाठीमागील उसाच्या शेतात पसार झाला.

माहीती मिळताच यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार,पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे हे संबधीत ठिकाणी पोलिस फौजफाटयासह हजर झाले.त्यानंतर पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी,ग्रामसुरक्षा दल यांच्यामदतीने पोलिसांनी शेकडो हेक्टर उसाच्या शेतात आरोपीची शोध मोहीम सुरु केली. कित्येक तास उलटुन देखील आरोपीला शोधण्यास पोलिसांना यश आले नाही.

ड्राॅन कॅमेराव्दारे आरोपीला शोधण्याचे नियोजन- उसाच्या क्षेत्राचे मोठे दडण असल्याने आरोपीला लपण्यास मोठी मदत झाली आहे.अंधार पडल्यास आरोपीला शोधणे कठीण होणार आहे.त्यासाठी आम्ही ड्राॅन कॅमेराव्दाराचा आधार घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT