Crime News  sakal
Crime | गुन्हा

Crime News : निकाल विरोधात लागला अन् न्यायाधीशांसमोरच कापली हाताची नस, भर कोर्टातील प्रकारामुळं खळबळ!

सकाळ डिजिटल टीम

Crime News : केरळ मधील त्रिशूर जिल्ह्यात एका प्रियकराने न्यायालयामध्ये न्यायमूर्तीसमोरच प्रेमासाठी आपल्या हाताची नस कापल्याची घटना घडली आहे.

31 वर्षीय तरुणाने हायकोर्टामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त समोर आले आहे. याचे कारण म्हणजे ज्या महिलेची त्याचे प्रेम संबंध होते. असा दावा त्यांनी केला होता. त्या महिलेचा ताबा कोर्टाने तिच्या आई-वडिलांकडे दिला आहे. यामुळे त्या व्यक्तीने कोर्टासमोरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

31 वर्षीय तरुणाचे नाव विष्णू असून 23 वर्षे महिला ही विष्णू सोबत एक महिन्यापासून राहत होती. महिलेच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. सोमवारी न्यायालयासमोर दोघेही हजर झाले. यावेळी त्यांच्या मुलीला विष्णू ने अवैधरित्या घरी कोंडून ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संबंधित महिलेने मला माझ्या परिवारासोबत जायचे असल्याचे कोर्टाला सांगितले. यावेळी तिने सांगितले की, माझ्या मनात विष्णू विषयी कोणताही प्रेमाची भावना नाही तो फक्त माझा मित्र आहे.

यावेळी संबंधित महिलेने असेही सांगितले की, मी विष्णू सोबत या ठिकाणी केवळ यासाठी राहत होती कारण, त्याने मला धमकी दिली होती की, जर मी त्याला सोडून गेली तर तो आत्महत्या करेल. याचबरोबर त्याचे लग्न झाले आहे मात्र त्याने सांगितले होते की त्याचे लग्न झालेले नसून तो तिच्यापासून विभक्त झाला आहे

यावेळी कोर्टाचा निर्णय ऐकल्यावर विष्णूने चाकू काढला आणि आपली नस कापली. यावेळी त्याला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT