Viral video Esakal
Crime | गुन्हा

Viral video: चक्क कारची डिक्की उघडी ठेवून त्यात बसवली लहान मुले...

किती बेजबाबदार पालक आहेत हे ? कृपया चौकशी करा सर आणि कारवाई करा,”

सकाळ डिजिटल टीम

हैराबादमधील हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात कारच्या मागच्या डिक्कीत 3 लहान मुले बसलेली दिसत होती. आणि विशेष म्हणजे ती डिक्की उघडी होती.

“किती बेजबाबदार पालक आहेत हे ? कृपया चौकशी करा सर आणि कारवाई करा,” एका वापरकर्त्याने  व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिले. वापरकर्त्याने हैदरबाद पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग करून कारवाईची मागणी केली.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर लगेचच हैदराबाद मधील सायबराबाद पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आणि वाहन चालकाला दंड ठोठावला. 

कारचा नोंदणी क्रमांक दिसत असल्याने सायबराबाद वाहतूक पोलिसांनी त्या चालकाला लगेच ई-चलन जारी केले. “सर, तुमच्या माहितीची पडताळणी झाली आहे आणि ई-चलन तयार करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी सायबराबाद वाहतूक पोलिसांशी हातमिळवणी केल्याबद्दल धन्यवाद,” वाहतूक पोलिसांनी मूळ ट्विटला असे उत्तर दिले आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार, कार नोंदणी प्रमाणपत्रात  4+1 कारमध्ये ड्रायव्हर वगळता फक्त 4 प्रवासी बसू शकतात.

निष्पापांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकावर कठोर कारवाई व्हायला हवी होती, असे काही कमेंट करणारे  म्हणत आहे.

“मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या पालकांना अटक करा. पालकांना चांगले कळले पाहिजे. ते आपल्या मुलांना कोणत्या प्रकारचे धडे देत आहेत,” अशी कमेंट एका वापरकर्त्याने लिहिले आहे.

तर असेही काही लोक होते ज्यांचा असा विश्वास होता की पालकांनी मुलांच्या विनंतीवरून हे केले असावे आणि त्यांना योग्य दमदाटी देऊन सोडले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

तेजश्री प्रधानला रिप्लेस करणारी अभिनेत्री होणार आई; समुद्रकिनारी फोटोशूट करत दाखवला बेबी बंप, तुम्ही ओळखलंत का?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

SCROLL FOR NEXT